Nashik News: जमीन संपादनास शेतकऱ्यांचा विरोध! शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे खासदार राऊत यांना साकडे

या गावांमधील शेतकरी शिष्टमंडळाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन शासनाने संपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
Bhaskar Gunjal, Nivrithi Jadhav and activists giving a statement to MP Raut.
Bhaskar Gunjal, Nivrithi Jadhav and activists giving a statement to MP Raut.esakal
Updated on

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील आडवण, पारदेवी प्रस्तावित औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांचा विरोध आहे.

या गावांमधील शेतकरी शिष्टमंडळाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन शासनाने संपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. (Farmers opposition to land acquisition delegation to MP Raut Nashik News)

शेतकऱ्यांनी खासदार राऊत यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार राऊत यांना निवेदन दिले. औद्योगीक वसाहत दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत आहे.

कारखान्यांतील सांडपाण्यामुळे धरणातील पाणी दूषित होईल, तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडला जाऊ शकतो. या प्रकल्पांमुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होतील, म्हणून हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, शिवसेना विधानसभा निरीक्षक मोहन बऱ्हे, दत्तू गुंजाळ, विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, नवनाथ कोकणे, हिरामण कोकणे, बाळू कोकणे, नामदेव कोकणे, किशोर शेलार व शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Bhaskar Gunjal, Nivrithi Jadhav and activists giving a statement to MP Raut.
Nashik News: शेतकऱ्यांना फटका अन्‌ आरक्षण आंदोलनाचा खटका! येवलेकरांना चौफेर नुकसान

५८ हजार ८८१ हेक्टरचे संपादन

इगतपुरी तालुक्यात यापूर्वी लष्करी प्रशिक्षण औद्योगिक वसाहत, धरणे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आदी प्रकल्पांसाठी ५८ हजार ८८१ हेक्टर शेतजमीन संपादन केली आहे. नवीन प्रकल्पासाठी ६८० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

ती संपादन करू नये. नवीन प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील, म्हणून आमच्या जमिनी वाचवा, अशी हाक शेतकऱ्यांनी राऊत यांना दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राऊत यांनी दिले आहे.

"वामनाने दोन पावले जमीन बळीराजाकडे मागितली. ती मिळाल्यावर एका पावलात पृथ्वी व दुसरे पाऊल पातळवर व तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवत बळी संपवला, हीच परिस्थिती इगतपुरी तालुक्यात आहे. जमिनीच्या क्षेत्रफळापैकी विविध प्रकल्पांसाठी ७२ टक्के संपादन केली आहे. नवीन प्रकल्प म्हणजे येथील बळीराजा पुन्हा पाताळात घालायचा आहे."

-भास्कर गुंजाळ, सचिव, कॉंग्रेस

Bhaskar Gunjal, Nivrithi Jadhav and activists giving a statement to MP Raut.
Nashik Traffic Crisis: येवला-नांदगाव महामार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा! मनमाडचा पूल खचल्याने ताण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.