नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार

nashik pune railway
nashik pune railwayesakal
Updated on

नाशिक रोड : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग (nashik-pune railway) हा महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी बेलतगव्हाण, विहितगाव, संसरी, नाणेगाव येथील शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकालगतच्या दुसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण करा, अशी मागणी करीत नाशिक- पुणे रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला. (Farmers-refuse-to-give-land-to-Nashik-Pune-railway-project-marathi-news)

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांची ‘ना’

नाशिक- पुणे या हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन विभागाकडून संसरी, बेलतगव्हाण, नाणेगाव गावातील शेतकऱ्यांना जागा मोजणीबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. ८ ते १२ जूनदरम्यान जागा मोजणीबाबत कार्यवाही होणार होती. परंतु गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पालाच विरोध केला. बुधवारी (ता. ९) संसरीत खासदार हेमंत गोडसे, रेल्वेचे सचिन कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. नियोजित रेल्वेमार्गामुळे संसरी गावाचे मोठे नुकसान होणार आहे. नााशिक-मुंबई रेल्वे लाइनच्या तिसऱ्या व चौथ्या लाइनकरिता पन्नास फुटापेक्षा जास्त जागेचे संपादन होत असताना पुन्हा गावाच्या दुसऱ्या बाजूने रेल्वेमार्ग गेला, तर शेतकरी बागायती क्षेत्रापासून भूमिहिन होईल. संसरीच्या शेतकऱ्यांनी सुचवलेल्या दुसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण केलेले असले तरी उपस्थित अधिकारी वर्गाने त्या मार्गाबाबत नाराजी दर्शवली. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकमार्गे नवीन मार्ग अधिग्रहित केला, तर सरकारी जमिनीवर प्रकल्प उभा राहू शकतो, अशी माहिती शेतकरी विजय गोडसे, आनंद गोडसे, सरपंच विनोद गोडसे, प्रशांत कोकणे, संजय गोडसे, अजय गोडसे, सुरेश गोडसे, बाळू गोडसे आदी शेतकऱ्यांनी दिली.

खासदार गोडसे व रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत गावागावांत बैठक

बेलतगव्हाण येथील बैठकीत रेल्वेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी. बालाजी देवस्थानला काही मोबदला देऊ नये, तर आम्ही जागा देऊ, अशी मागणी केली. बाळासाहेब हगवणे, किरण पाळदे, बापू हगवणे, शरद पाळदे, अण्णा पाटील, किसन पाळदे, पोपट पागेरे, कैलास पाटील, किरण कुटे, गिरीश हगवणे आदी शेतकरी उपस्थित होते. नाणेगाव येथे तळेबाबा मंदिरात बैठक झाली. शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला. कुलकर्णी यांनी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना माहिती देत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर दहा मागण्या मांडल्या. खासदार गोडसे, सुनील आडके, सुखदेव आडके, कचरू रोकडे, सुरेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान आडके, विजय आडके, कैलास आडके, देवीदास आडके, दिलीप मोरे, डॉ. मोहन आडके, सचिन आडके, पोलिसपाटील संदीप रोकडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

nashik pune railway
सिक्स सिग्मा प्रकरण भोवले; आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार काढला
nashik pune railway
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी महापालिकेचा बाह्यरुग्ण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.