Dr Bharti Pawar : कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना.... डॉ. भारती पवार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Farmers should be given help by declaring drought dr bharti pawar demands to chief minister nashik news
Farmers should be given help by declaring drought dr bharti pawar demands to chief minister nashik newsesakal
Updated on

Maharashtra News : राज्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाने महिनाभरापासून दडी मारली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झाले.

यासाठी राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे. (Farmers should be given help by declaring drought dr bharti pawar demands to chief minister nashik news)

डॉ. पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव मांडले. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने नाशिकसह राज्यातील अन्य जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंताग्रस्त झाला. धरणातही साठा नाही. विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली आहे.

त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी, धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी या वेळी सांगितले.

पुरेसा पाऊस नसल्याने खरिपाच्या झालेल्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी, शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmers should be given help by declaring drought dr bharti pawar demands to chief minister nashik news
Maharashtra Drought News : हक्काच्या पाण्यासाठी राजकारण्यांची आश्वासने ; पाण्याअभावी शेतकरी मात्र हतबल

याशिवाय, अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई जाणवू लागली. याचा मोठा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होणार असून, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.

यामुळे शेतकऱ्यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून, बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे. या परिस्थितीत चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना भरघोस मदत जाहीर करावी. तसेच, राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे आणून दिले निदर्शनास

नाशिक जिल्ह्यात गेल्या ३० दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने अपुऱ्या पावसामुळे धरणांतील साठाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये आजमितीस जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न गंभीर झाल्याचे या वेळी डॉ. भारती पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

Farmers should be given help by declaring drought dr bharti pawar demands to chief minister nashik news
Drought News : खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा; आ. रावल यांची मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.