Nashik Agriculture News: पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; रब्बीतील पिकेही धोक्यात!

Yellowing tomato leaves due to cloudy weather.
Yellowing tomato leaves due to cloudy weather.esakal
Updated on

खेडभैरव (जि. नाशिक) : आठवड्यापासून इगतपुरी तालुक्यात बहुतांश ढगाळ हवामान, धुके, कमी-अधिक थंडीमुळे त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सतत ढगाळ वातावरण असून अशा हवामानामुळे पिकांची वाढ खुंटून रोगांचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. आधीच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या हंगामात प्रचंड नुकसान झाले. आता रब्बीतील पिकेही धोक्यात आली आहेत. (Farmers struggle to save crops Rabi crops also in danger Nashik Agriculture News)

इगतपुरी तालुक्यासह खेड, टाकेद, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणगाव, धामणी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, सोनोशी, वासाळी आदी परिसरात अवकाळीमुळे खरिपातील भाताचे नुकसान झाले होते. खरिपानंतर रब्बीतील गहू, हरभरा, वाल, मसूर, टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी लागवड सुरू आहे.

या वर्षी रब्बसाठी पेरणीला उशीर झाला होता. यातच पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर करपा, अळी तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. बागायती पिकांवर कीड लागणे, नागअळी पडणे यामुळे शेतकऱ्यांना महागड्या औषधांचा वापर करावा लागत आहे.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. तसेच उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांवरही याचा परिणाम होत असून उत्पादनात घट झाली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Yellowing tomato leaves due to cloudy weather.
Nashik News : थंडी, धुक्याने भरली हुडहुडी; द्राक्षनगरीचा पारा घसरला!

"खरीप हंगामातील भात पिकाचे यंदा अवकाळी पावसाने पूर्णतः नुकसान झाले. सध्या ढगाळ वातावणामुळे पिकांवर विविध रोग धावू लागले आहेत. बागायती पिकांच्या उत्पादनापेक्षा पीक वाचविण्याचाच खर्च जास्त होत आहे." - बाळासाहेब वाजे, शेतकरी, खेडभैरव

"दोन-तीन वर्षांपासून विविध कारणांनी शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आहे. कर्ज, उधार, उसनवार करून पीक वाचविण्याचा खर्च करत आहेत. निसर्गानेच शेतकऱ्यांची साथ सोडल्याने आता करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे."

- सोमनाथ बऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते, अधरवड

Yellowing tomato leaves due to cloudy weather.
Nashik Sports Update : दिव्यांग खेळाडू दिलीप गावितचे यश!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.