धक्कादायक! जनावरांचा हंबरण्याच्या आवाजाने समजला प्रकार; बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच

4leopard_20terror.jpg
4leopard_20terror.jpg
Updated on

नाशिक : (अंबासन) पहाटेची वेळ...जनावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी ते गेले. दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. कुत्रेही भुंकत होते. काही अंतरावर जाताच पावलांचे ठसे दिसले. जरा संशय वाटल्याने ते हळूहळू पुढ् गेले. अन् नंतर जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वाचा काय घडले?

पहाटे समजली घटना...

एकीकडे दिवाळीची धुमधाम सुरू असतांनाच अगदी गावालगत असलेल्या शेतकरी रमेश दौलत कोर यांच्या मालकीच्या खळवाडीत पहाटेच्या सुमारास बिबट्या काटेरी झुडूपातून दबक्या पावलांनी अलगद शिरला. यामुळे खळवाडीत दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. परिसरात बिबट्याची चाहूल लागताच कुत्रे भुंकत होती. पहाटेच्या सुमारास मुलगा भुषण कोर जणावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी गेले. तेव्हा बैलगाडीच्या चाकाला बांधलेले म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याचे दिसून आले. भुषणने आजूबाजूला असलेल्या नागरिकांना सतर्क केले.

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

खळवाडीत बिबट्याचे ठसे मिळून आले. त्यामुळे परिसरात आणखीनच भीती पसरली आहे. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी वनपाल बोरसे, रेणुका आहिरे व राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. परिसरात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतक-यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()