Nashik Agriculture News : पावसाअभावी पिवळं सोनं 1500 कोटींनी काळवंडणार! जिल्ह्यात शेतातच पाचोळा...

Corn crop completely harvested in the field.
Corn crop completely harvested in the field.esakal
Updated on

Nashik Agriculture News : मका पीक भरण्याची, वाढीची आणि पोटरीत असतानाच्या काळातच तब्बल महिन्याहून अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेलं पिवळं सोनं यंदा काळवंडणार आहे.

जोरदार मागणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अब्जावधीचे उत्पन्न देणाऱ्या याच पिकाची यंदा विक्रमी पेरणी केली; पण लाखो हेक्टरवरील मक्याचा शेतातच पाचोळा झाल्याने हेक्टरी उत्पादनात २५ ते ४० क्विंटलपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे पंधराशे कोटी रुपयांची हानी सहन करावी लागणार आहे. (Farmers will have to bear loss of around 1500 crore rupees in maize nashik agriculture news)

कांद्याचा अन द्राक्षाचा हा जिल्हा आता मक्याचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा बनला आहे. जिल्ह्यात खरिपातील सहा लाख २७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, यात तब्बल दोन लाख ४४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. कमी भांडवल, मर्यादित श्रम अन अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत सर्वाधिक पसंती मिळत आहे.

जिल्ह्यातील पीक पॅटर्न बदलून बाजरी, डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटले असूनही मक्यासह सोयाबीन, कांदा व भाजीपाला पिकाने जागा घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतविले जात असून, उत्तम पर्याय मिळाला आहे.

प्रचंड प्रमाणात वाढलेल्या पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्याच्या मागणीत वाढ झाली असून, या दोन्ही उद्योगांसाठी राज्यात व युक्रेन, मलेशिया, व्हिएतनाममध्येही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो. वाढलेल्या मागणीमुळे मक्याचे दर २१०० ते २४०० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Corn crop completely harvested in the field.
Nashik Agriculture News : इगतपुरीत भात शेतीसाठी वातावरण; बळीराजा शेतीकामात व्यस्त

यंदा नुकसानीचा विक्रम?

अल्प पावसामुळे व पेरणी महिनाभर लांबल्याने रिमझिमवर मका पीक निघेल, या भरवशावर यंदा क्षेत्रात वाढ झाली आहे. किंबहुना, मका बियाण्यांच्या दरातही वाढ झाल्याने हंगामाच्या सुरवातीला जिल्ह्यात तब्बल १७५ कोटी रुपये मका बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना लागले आहे.

पेरणीनंतर रिमझिमवर मक्याचे पीक तरले; पण ऐन वाढीच्या व फुलोऱ्यात येण्याच्या काळातच मागील ३० ते ४० दिवसांत पावसाचा थेंबही नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० टक्के क्षेत्राला फटका बसला असून, निम्म्या क्षेत्रातील मक्याचा तर शेतातच पाचोळा झाला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत मक्याचा पुरवठा होणार नाही. किंबहुना यंदा मक्याच्या उत्पादनात घट होऊन नुकसानीचा विक्रमच होईल, असे चित्र आहे.

असा बसेल कोटींचा फटका!

जिल्ह्यातील जमिनीचा पोत पाहता मक्याचे हेक्टरी ४० ते ७५ क्विंटलपर्यंत पीक निघते. म्हणजेच ५० क्विंटलची जिल्ह्याची सरासरी आहे. या हिशेबाने पेरणी झालेल्या दोन लाख ४४ हजार ९६८ हेक्टरमध्ये हेक्टरी सरासरी ५० क्विंटल उत्पादन मिळाले असते अन प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भावानुसार जिल्हाभरात शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Corn crop completely harvested in the field.
Nashik Agriculture News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया पाहतो पावसाची वाट; दुबार पेरणीचे संकट गडद

मात्र, सध्या शेतातच मक्याचा पाचोळा झाल्याने बिट्या लागणे दुरापास्त झाले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येणाऱ्या मका पिकात हेक्टरी १२ ते २० क्विंटल म्हणजे सरासरी १५ क्विंटल उत्पादन हाती लागेल. या उत्पादनाचे केवळ ८०० कोटींच्या आसपासच उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडणार असून, सुमारे एक हजार ५०० कोटी रुपयांच्या आसपास झळ बसणार असल्याचे जाणकार सांगतात.

असे आहे अर्थशास्त्र...

मक्याचे पीक १२० दिवसांत येते. जिल्ह्यातीलच जमिनीचा पोत पाहता एकरी २५ ते ४०, तर सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न मक्याचे निघते. सरासरी दोन हजार रुपयांचा भाव गृहीत धरल्यास सरासरी ६० ते ७० हजारांचे उत्पन्न एक एकरातून मिळते. यातील सुमारे २५ ते ३५ हजारांचा खर्च जातो; तर अंदाजे ३० ते ४० हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात.

"सोयाबीन, मका या प्रमुख पिकांची परिस्थिती पाहावत नसून, शेतातच पिकांचा पाचोळा झाल्याने दोन्ही प्रमुख पिकांच्या उत्पन्नात ६० ते ७० टक्के घट निश्चित आहे. आता पाऊस येऊनही ही पिके हातची जातील. शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान या पिकात होणार आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळावी." - अशोक कुळधर, कृषितज्ज्ञ, सायगाव

Corn crop completely harvested in the field.
Nashik Agriculture News : जिल्ह्यात 3 हजार एकर क्षेत्र बनले सुपीक; बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेतही मोठी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.