लॉकडाऊनने शेतकरी चिंतेत! कष्टाने पिकवलेला माल उकिरड्यावर

लॉकडाउनमुळे बहुतांश बाजार बंद व वाहतूकसेवाही विस्कळित असून, भाजीपाला विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे.
farmers
farmerse-saka
Updated on

ब्राह्मणगाव (जि. नाशिक) : लॉकडाउनमुळे(Lockdown) बहुतांश बाजार बंद व वाहतूकसेवाही(Transport) विस्कळित असून, भाजीपाला विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतात लावलेले गिलके, टरबूज(Watermelon) तोडून उकिरड्यावर टाकून दिले आहेत. (Farmers worried over lockdown)

लॉकडाउनमुळे मंदावली विक्री

महागडी बियाणे(Sesds), महागडी औषधे(medicines), मजुरी(labour), निसर्गाचा फटका हे सर्व नुकसान सहन करत असताना लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री मंदावली आहे. सात, आठ रुपये किलोने बळजबरीने माल विक्री करावा लागत आहे. काही शेतकरी डोक्यावर पाटीत घेऊन गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री करत आहेत. त्यातच मालाला मोठी बाजारपेठ जवळ मिळत नसल्याने भाजी उकिरड्यावर फेकून दिली जात आहेत.

farmers
खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्राचा डाव

या संकटात खरिपाची तयारी कशी करावी?

सध्या हिरवी मिरची(Green chilli), टोमॅटो(Tomato), कोबी(Cabbage), वांगी(Eggplant), भेंडी(Okra), गवार(Guar) या सर्व भाजीपाल्यांची सारखीच अवस्था झाली आहे. टरबूज, खरबूज, कलिंगडबाबत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक अपेक्षा होती. मात्र महामारीमुळे शेती व शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबूज विनाविक्री शेतातच पडू दिले आहेत. कांद्याचे घसरते भाव, त्यात कांदा मार्केट बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना आता बियाणे, खते, मजुरीसाठी हाती भांडवल पाहिजे. मात्र या सर्व संकटात खरिपाची तयारी पैशविना कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

farmers
'सारथी'तून शाहु महाराजांचे नाव काढा; संभाजीराजे कडाडले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.