Crime : मुलीवरील अत्याचारप्रकरणी नराधम पित्याला जन्मठेप

Child Sexual Abuse
Child Sexual Abusesakal
Updated on

नाशिक : पंचवटी परिसरामध्ये जन्मदात्या पित्याने आपल्या चिमुकलीवर अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल खटल्यात त्या नराधम पित्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा ठोठावली असून, २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात आरोपी पित्याविरोधात बलात्कार (Rape) व पोक्सो (Pocso) अन्वये गुन्हा दाखल होता. (father sentenced to life imprisonment for abusing his daughter Nashik Crime News)

पंचवटी पोलीस ठाण्यांतर्गत, पंचवटीतील फुलेनगर परिसरामध्ये ९ एप्रिल २०२१ रोजी पीडित मुलगी घरामध्ये झोपलेली असताना, आरोपी ४१ वर्षीय पिता तिच्या शेजारी झोपला आणि तिला धमकावत त्याने अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसात आरोपीविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी करीत आरोपीविरोधातील पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Child Sexual Abuse
वकिलवाडीत अचानक कोसळले गुलमोहराचे झाड; पाहा Photos

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम. व्ही. भाटीया यांच्यासमोर चालला. यावेळी न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲड. रेवती कोतवाल यांनी युक्तीवाद केला. यात आरोपीविरोधात पुरावे, साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार गुन्हा शाबित झाला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश भाटिया यांनी आरोपी पित्यास जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. डी. कडवे यांनी कामकाज पाहिले.

Child Sexual Abuse
Nashik : मनमाडला वीज कंपनीचा लाचखोर सहायक अभियंत्यासह तिघे जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.