Nashik News : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही ठराविक शेतकऱ्यांची नावे नुकसानपात्र शेतकऱ्यांच्या यादीत असून, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत.
यामुळे नुकसानपात्र यादीत सर्व शेतकऱ्यांचा समावेश करावा व झालेल्या पंचनाम्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी विखरणी येथील शेतकरी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. १४) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. (Faulty Panchnama of Damage Vikharani farmers fast on eve of Independence Day Nashik News)
नुकसान होऊनही भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विखरणी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की २०२२-२०२३ मध्ये अतिवृष्टी, संततधारेसह नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विखरणी येथेही पंचनामे झाले होते. आता पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून, त्यात मोजक्याच शेतकऱ्यांच्या समावेश आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या पावसाने सरसकट शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना, मोजकेच शेतकरी पात्र कसे? मागील वर्षी झालेल्या पंचनाम्यांची चौकशी करून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा यादीत समावेश करावा,
२०२२ -२०२३ मध्ये झालेल्या मूळ पंचनाम्यांचा प्रती मिळाव्यात, नुकसानभरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी मिळावी, नुकसानभरपाईसाठी अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पात्र यादीत समावेश करावा, नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तत्कालीन तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी केलेल्या सदोष पंचनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यांसह इतर मागण्या मान्य कराव्यात.
प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकासाधिकारी, कृषी अधिकारी आदींना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.