सुरगाणा तालुक्यातील गावांना भुकंपाचे हादरे? ग्रामस्थांमध्ये घबराट

fear among the citizens as the villages in Surgana taluka are feeling mild shocks
fear among the citizens as the villages in Surgana taluka are feeling mild shocks Sakal
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : अंबोडेजवळील खोकरविहर, चिंचपाडा, खोकरविहीर, चिऱ्यापाडा या गावात चार ते पाच दिवसांपासून भूकंप सदृश हादरे बसत आहेत. गरूवारी (ता.२१) सकाळी आठच्या दरम्यान फायर उडविल्यासारखा जोरात आवाज आला, संध्याकाळी आठच्या सुमारास मांडणीवरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज गावभर आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. काही वेळा कौलांचा आवाज येतो. गावात हादरं बसतय, धाकधूक हुयत अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

ग्रामस्थ एकनाथ गांगोडे यांनी सांगितले की, काही दिवसांपासून असे आवाज येत आहेत. आठ दिवसांपूर्वी १२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊला असाच आवाज आला होता. त्यावेळी घर हलल्यासारखा भास झाला. १८ ऑक्टोबरला सकाळी साडेआठला गावभर भांड्याचा आवाज आला होता. २२ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास सौम्य धक्का बसल्यागत जाणवले. दुसरा दीडला आणि रात्री पावणेसातला जोरात आवाज झाला. दोन वर्षांपूर्वी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर चामोलीचा माळ येथील जमिनीला दोनशे ते अडीचशे फुटांपर्यंत उभी भेग (चीर) पडून जमिन खचली होती. हा नेमके काय हा प्रकार आहे, याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ गांगोडे यांच्यासह देविदास पाडवी, निवृती बाऱ्हे, नामदेव जाधव, गंगाराम बा-हे, गंगाराम गांगोडे, मधुकर वार्डे, एकनाथ बाऱ्हे, जानकी बाऱ्हे, योगीराज गवळी यांनी केली आहे. याबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

fear among the citizens as the villages in Surgana taluka are feeling mild shocks
दोन सख्ख्या भावांचा एमपीएससीत डंका! साकारले आई-वडिलांचे स्वप्न


अनेकवेळा असे आवाज येत असतात. आज त्याची तीव्रता जास्त होती. बार उडाल्यासारखा आवाज येतो. परिसरात तर कुठेही विहिरीचे काम सुरु नाही. भांड्याचा आवाज येतो. जमिनीतून आवाज आल्याचे जाणवते. मात्र हा आवाज नेमका कशामुळे येतो याची शहानिशा करून शासनाने आमची भीती दूर करावी.
- एकनाथ गांगोडे, ग्रामस्थ खोकरविहीर.

खोकरविहिर, चि-याचापाडा, चिंचपाडा या गावात गुरूवारी (ता.२१) सकाळी आठच्या सुमारास जोरात आवाज आला. संध्याकाळी आठच्या सुमारास घरात ठेवलेल्या भांड्याचा आपोआप आवाज झाला. अचानक हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा व्हावी. तहसील कार्यालयात आज अहवाल सादर केला आहे.
- ज्ञानेश्वर पगार, तलाठी, खोकरविहीर.

खोकरविहीर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याबाबत भूकंपमापक यंत्रणा तसेच नैसर्गिक आपत्ती कक्षाला कळविले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लवकरच भूकंप मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
- राजेंद्र मोरे, नायब तहसीलदार सुरगाणा.

fear among the citizens as the villages in Surgana taluka are feeling mild shocks
नांदायला येत नाही म्हणून हत्या; भर बाजारात चिरला गळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.