Nashik Bribe Crime : महिला उपअभियंता, लिपिक, सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक

bribe crime
bribe crimeesakal
Updated on

नाशिक रोड : दोन विद्युत रोहित्र हलविण्याच्या कामाचे दोन अंदाजपत्रकांची तपासणी करण्याकामी मदत करून प्रकरण पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाच मागणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या महिला उपअभियंता, लिपिक व सहाय्यक अभियंत्याला लाच मागितल्या प्रकरणी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Female Deputy Engineer Clerk Assistant Engineer arrested for accepting bribe Nashik Bribe Crime)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

bribe crime
Nashik Political News : नाशिकचा विकास नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल!

दीप्ती धीरेन वंजारी (उपकार्यकारी अभियंता, वर्ग-२), सचिन मुरलीधर बोरसे (निम्नस्तरीय लिपिक, वर्ग-३), राजेंद्र साहेबराव पाटील (सहायक अभियंता, वर्ग -२) यांना अटक करण्यात आली आहे. दोन हजार रुपये व अडीच हजार रुपये मागितल्याप्रकरणी तिघांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

तक्रारदार यांना मिळालेल्या योजनेमार्फत दोन विद्युत रोहित्र हलविण्याबाबतचे कामाचे दोन अंदाजपत्रकांची तपासणी करणे, मदत करून प्रकरण पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पंच साक्षीदार समक्ष उपअभियंता दीप्ती वंजारी, निम्नस्तरीय लिपिक सचिन बोरसे यांनी तक्रारदाराकडे पंच साक्षीदार समक्ष लाचेची मागणी केली.

तसेच सहाय्यक अभियंता साहेबराव पाटील यांनीही विद्युत रोहित्र बसवण्याचे मिळालेल्या कामाचे अंदाजपत्रक मंजुरी कामे मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २५०० रुपयांची पंच साक्षीदार समक्ष लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संदीप साळुंखे यांनी ही कारवाई केली आहे.

bribe crime
Ajay Boraste | सिल्वर ओकचे दलाल कोण आहे, हे सर्वांना माहीत : अजय बोरस्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()