रेल्वेत नोकरीसाठी 9 लाखांना फसवले; महिला डॉक्टरला अटक

lady doctor
lady doctoresakal
Updated on

नाशिक : आपला पती शासकीय सेवेमध्ये वर्ग एकचा अधिकारी आहे. त्याच्या मंत्रालयात ओळखी आहेत. भारतीय रेल्वेत नोकरी लावतो, असे सांगून नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिला डॉक्टरला इस्लामपूर पोलिसांनी नाशिक येथून गुरुवारी (ता. १२) अटक केली. इस्लामपूर पोलिस पथकाने नाशिक येथे तिच्या राहत्या घरी छापा टाकून तिला अटक केली. गेले दीड वर्ष ती पोलिसांना चकवा देत होती. या रेल्वे नोकरी फसवणूक प्रकरणात महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील लोकांचा समावेश आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

९ लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - डॉ. मनीषा प्रमोद मांदाडे (उत्तर दादर-पश्चिम, मुंबई) हिने राजेंद्रकुमार शिंदे यांच्याकडून त्यांच्या मुलाला भारतीय रेल्वेत नोकरी लावतो, असे सांगून नऊ लाख रुपये टप्प्याटप्प्याने तिच्या व अन्य दोघांच्या बँक खात्यावर घेतले होते. आपला पती शासकीय सेवेमध्ये वर्ग एकचा अधिकारी आहे. त्याच्या मंत्रालयात ओळखी आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाला भारतीय रेल्वे, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, आईआरसीटीसी, भारतीय कोळसा निगम व भारतीय खाद्य निगममध्ये कोठेही नोकरी लावू शकते, असे सांगून २०१८ मध्ये शिंदे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. नागपूर येथे तिचा भाऊ व तिचा मामा उच्चपदस्थ असल्याचे सांगून शिंदे यांच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्रे व्हाॅट्सॲपवर मागवून घेतली. यापूर्वी अशी नोकरीची भरपूर काम केल्याचे सांगितले. शिंदे यांचा विश्वास बसावा म्हणून नोकरी लावलेल्या एकाचे मूळ ओळखपत्र दाखविले. इस्लामपूरमध्ये येऊन शिंदे यांच्याकडून वेळोवेळी ९ लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

डॉक्टर दीड वर्ष पोलिसांना चकवा देत होती

पैसे घेतल्यानंतर मांदाडे हिने नागपूरमधील रितेश मोंढे व हर्षल यांची ओळख करून दिली. ते दोघे शिंदे व त्यांच्या मुलाला घेऊन पश्चिम बंगालमधील असनसोल स्टेशनवर घेऊन गेले. तिथे कामेश्वर सिंग या व्यक्तीची ओळख करून दिली. त्या दोघांनी दोन दिवसांत नेमणूक आदेश दिला जाईल, असे सांगितले. आठ दिवस झाले, तरी आदेश न मिळाल्याने शिंदे गावी परत आले. काही दिवसांनी काम झाल्याचा मांदाडेचा फोन आला. ते दोघे असनसोलला गेले. वाट पाहूनही नोकरीचा आदेश मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे शिंदेंनी मांदाडेकडे पैसे परत मागितले. तिने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी राजेंद्रकुमार शिंदे यांनी २८ जानेवारी २०२० ला डॉ. मनीषा मांदाडे, कामेश्वर सिंग, रितेश मोंडे, हर्षल व राज सिंघानिया यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिसांत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. डॉ. मांदाडे दीड वर्ष पोलिसांना चकवा देत होती.

lady doctor
नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात आढळले १४४ कोरोना बाधित

रॅकेट असण्याची शक्यता!

या रेल्वे नोकरी फसवणूक प्रकरणात महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील लोकांचा समावेश आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अरविंद काटे, उमाजी राजगे, सौ. खोत यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.