Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कारभार कायम चर्चेत असतानाच, याच विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांची बदली झालेली असताना टेबल सोडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी काम करून या टेबलावर येऊन दीड महिन्यांपासून काम करत असल्याची चर्चा विभागातच आहे. याकडे विभाग प्रमुखासह प्रशासन डोळेझाकपणा करत असल्याचे चित्र आहे. (female employee who transferred to trimbakeshwar has not left table yet nashik zp news)
दीड महिन्यांपूर्वी मुख्यालयात वर्षोनुवर्षे एकाच टेबलावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यात आले. यात बांधकाम विभागातील महिला कर्मचारीची बदली त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यास विभागाने कार्यमुक्त देखील केले आहे. मात्र, असे असताना देखील संबंधित बदली झालेल्या कर्मचारी महिलेने टेबल सोडलेला नाही. त्या टेबलावरील कार्यभार दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे सोपविलेला नाही.
याच टेबलावर येऊन संबंधित कर्मचारी काम करत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये टेबल सामान्य प्रशासन विभागातून बदली होऊन आलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र, या कर्मचारी महिलेला अद्याप पदभार देण्यात आलेला नाही. या प्रकरणी संबंधित कर्मचारी दररोज विभागप्रमुखांकडे दाद मागत आहे.
मात्र, विभागप्रमुखांकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून बांधकाम विभागात हा खेळ सुरू आहे. प्रशासन बघ्याच्या भूमिकेत दिसत आहे. बदली झालेल्या कर्मचारी महिलेला विभागातीलच काही अधिकारी प्रोत्साहन देत असल्याचे बोलेल जात आहे.
"संबंधित टेबलावरील कर्मचाऱ्याची त्र्यंबकेश्वर येथे बदली झालेली असून त्यास कार्यमुक्त देखील करण्यात आलेले आहे. कर्मचारी यांच्याकडून पदभार काढून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. यावरही कार्यवाही होत नसल्यास दोषींवर कारवाई केली जाईल." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.