Nashik News : केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने या आठवड्यात कामगार मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल जारी केला.
त्यानुसार कामगारांच्या सहभाग मोजमाप करण्याच्या तत्त्वानुसार देशातील महिला कामगार मनुष्यबळ सहभागाचा दर ३७ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.(Female labor force participation rate up to 37 percent nashik news)
हा दर २०१७-१८ मध्ये २३.३, २०१८-१९ मध्ये २४.५, २०१९-२० मध्ये ३०, २०२०-२१ मध्ये ३२.५, २०२१-२२ मध्ये ३२.८ टक्के होता. महिलांच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक आणि राजकीय विकासाच्या उद्देशाने धोरणात्मक उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण निश्चित करण्यासाठी
सरकारने राबवलेल्या निर्णायक कार्यक्रमाचा हा परिणाम असल्याचा दावा केंद्राने केला आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनापर्यंत सरकारी उपक्रम पोचले आहेत.
मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता सुविधा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम याचा दाखला त्यासाठी देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.