नाशिक : गंगापूर रोड येथील आसावरी सहस्रबुद्धे यांचा पौराहित्यातला प्रवास पन्नाशीनंतरचा. गेल्या वीस वर्षापासून महिलांचे वर्ग त्या घेत आहेत.
‘सर्वोपकार करणाय सदा आग्रचित्ता’ दुर्गेच्या आराधना करताना नैराश्य दूर होऊन चांगले करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा मिळते, असा अनुभव त्यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना कथन केला. (females in Priesthood asawari sahasrabudhe nashik Latest Marathi News)
त्यांचे सासर माहेर नाशिकचेच. शिक्षण बी. कॉम झाले असून, समाज कार्यातील आवडीमुळे सध्या त्या राणी भवन येथे रेक्टर म्हणून काम पाहात आहेत. २००० पासून त्यांचा पौराहित्याचा प्रवास सुरू झाला.
माहेरी व सासरी आजोबा व आजेसासरे यांच्याकडून रुद्र, अथर्वशीर्ष पठण यांचे सातत्याने होणारे पूजन व त्यामुळे निर्माण झालेली आवडही त्यांना पौराहित्याच्या माध्यमातून जोपासता आली. तसेच वर्गाला प्रवेश घेतल्यावर श्रीमती. मंडलिक यांच्या व्याख्यानात त्यांनी सांगितलेले मंत्राचे उच्चाराचा गूढ अर्थ, त्यामागची पार्श्वभूमी, अभ्यास यामुळे कुतूहल अजूनच वाढत गेले.
पाच वर्षाचे शिक्षण घेतले. तसेच साने गुरुजी व श्रीमती. दुगल यांचे लाभलेले प्रभावी मार्गदर्शन याचा मोठा वाटा आहे. घरूनही प्रोत्साहन मिळाले. घरातील जबाबदारी पार पाडून आवड जोपासताना उत्साह वाढत गेला.
तसेच, महिलांना शिकवताना उच्चारण शुद्धी, नियम, अर्थाची जाणीव याबाबत मार्गदर्शन करताना समाधानाचा खजिना वेगळाच आहे. तसेच शिकणाऱ्या महिलांच्याही समाधानकारक प्रतिक्रियांनी मन प्रसन्न होते. पौराहित्य करतानाच्या अनुभवाविषयी त्या म्हणाल्या, की सटाण्याला शंभर महिलांनी मिळून रुद्रपठण केले.
त्या वेळी सर्वांचे एकताल व सुरातले पठण, आरतीमुळे वातावरणातील चैतन्य समाधान देऊन गेले. सोमेश्वर येथील बालाजी मंदिरात पद्मावती देवीची प्राणप्रतिष्ठासाठी ७० महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. एवढ्या महिलांनी मिळून केलेली प्राणप्रतिष्ठा, मंत्रोच्चार, स्वर यामुळे वातावरण दणाणून गेले.
यामुळे सर्वांनी कौतुक केले. ‘सर्वेना सुखी सन्तू’ या उक्तीप्रमाणे जेवढे चांगले देता येईल तेवढे दुसऱ्यांना दिल्यावर आनंद तसेच तयार होणारी मनोभूमिका खूप सकारात्मक असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.