Festival Unity: विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद मिलाद’ मिरवणूक! सलोख्याचे दर्शन; एकमेकांच्या मिरवणुकीचे स्वागत

In the meeting held at Police Commissionerate on Monday, Prof. Devyani Farande, Ankush Shinde, Shahr-e-Khatib, Haji Wasim Peerzada
In the meeting held at Police Commissionerate on Monday, Prof. Devyani Farande, Ankush Shinde, Shahr-e-Khatib, Haji Wasim Peerzadaesakal
Updated on

Festival Unity : यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘ईद- ए- मिलाद’ आहे. शहराच्या गणेश विसर्जन मार्गावरूनच ईद ए मिलादची मिरवणूक काढण्यात येते. यामुळे पोलिस प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.

आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत शहर- ए- खतीब यांनी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (ता. २९) ‘ईद मिलाद’ ची मिरवणूक मुस्लिम बांधवांकडून काढण्यात येईल अशी भूमिका घेतली.

भूमिकेचे उपस्थित सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तर, गणेश विसर्जन मिरवणुकीतही गुलाल आणि फटाके वाजविणार नसल्याचे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट केल्याने, हिंदू- मुस्लिम बांधवांच्या सामाजिक व सौदाहर्यतेचे दर्शन दिसून आले. (Festival Unity Eid Milad procession on second day of ganesh visarjan Vision of Reconciliation nashik)

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता. १८) बैठक झाली.

या वेळी शहर ए खतीब हफीज हिसामुद्दीन, बडी दर्गा मशीद ट्रस्टचे हाजी वसीम पीरजादा, हाजी झाकिर अन्सारी, मुफ्ती मेहबूब अलम, मुफ्ती मुस्ताक अहमद, मौलाना जफर, हाजी सईद शेख, हाजी शाकीर, नाशिक महागणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे,

माजी महापौर विनायक पांडे, सत्यम खंडाळे, पोपट नागपुरे, महेश महंकाळे, बबलू परदेशी, गणेश बर्वे, रामसिंग बावरी, लक्ष्मण धोत्रे, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, अनिल तटकोट, साची सिंग यांच्यासह गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सिद्‌धेश्वर धुमाळ उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In the meeting held at Police Commissionerate on Monday, Prof. Devyani Farande, Ankush Shinde, Shahr-e-Khatib, Haji Wasim Peerzada
Ganeshotsav : पुण्यनगरीत गणरायाचे उत्साहात स्वागत

या वेळी शहर-ए-खतीब यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे ईद ए मिलाद २९ सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता काढण्याबाबत मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहेत.

तसेच, गणेश विसर्जन मिरवणुकीप्रमाणेच मुस्लिम बांधवही ईदच्या मिरवणुकीत डॉल्बी वा डीजेचा वापर करणार नसल्याचे सांगितले. तर, समीर शेटे, विनायक पांडे यांनी विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळला जाणार नाही.

डीजे व फटाके न वाजविण्याबाबत शहर ए खतीब यांना आश्वासित केले. त्याचप्रमाणे, गणेश विसर्जनावेळी मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सामील होऊन स्वागत करावे तर, दुसऱ्या दिवशी काढण्यात येणाऱ्या ईदच्या मिरवणुकीचे स्वागत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे.

In the meeting held at Police Commissionerate on Monday, Prof. Devyani Farande, Ankush Shinde, Shahr-e-Khatib, Haji Wasim Peerzada
Satara Ganeshotsav : आनंदमयी पर्वाला दिमाखात सुरुवात; तब्बल दोन लाख 35 हजार 608 गणेशमूर्तींची भक्तिभावाने स्थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.