Festival Unity: कलेच्या माध्यमातून सलोखा जपण्याचा प्रयत्न! मुस्लिम तरुणाकडून बाप्पाच्या मूर्तीला फेट्याचा साज

Aslam Syed tying the idol of Bappa
Aslam Syed tying the idol of Bappaesakal
Updated on

Festival Unity : देशात एकीकडे दिवसेंदिवस जातीय सलोखा बिघडत असताना नाशिक शहरात अस्लम सय्यद मुस्लिम तरुणाची कला सलोखा टिकवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. बाप्पाच्या मूर्तीस फेटा बांधून अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न हा तरुण करीत आहे.

हिंदू- मुस्लिम बांधवांनी त्याच्या कलेचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Festival Unity Trying to preserve harmony through art Bappa idol decorated with turban by Muslim youth nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

स्लम भागात राहून फेटे बांधण्याचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा अस्लम सय्यद फेटे बांधण्याच्या कलेतून शहरवासीयांच्या कौतुकाचा मानकरी ठरला आहे.

विवाह, राजकीय सोहळे, राजकीय तथा सामाजिक सभा, शासकीय मोठमोठे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांमध्ये मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम त्याच्याकडून केले जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

तीन वर्षांपूर्वी त्याच्या मित्राने गणेशोत्सवात बाप्पाची स्थापना करण्यासाठी डोंगरे मैदान येथे मूर्ती खरेदी केली. त्या मूर्तीस अस्लम यास फेटा बांधून देण्याची विनंती केली. अवघ्या काही मिनिटात त्याने आकर्षक फेटा बांधला.

त्याची कला पाहून गणपती स्टॉलधारक थक्क झाले. तेव्हापासून दरवर्षी येथील विविध स्टॉलधारक त्यास बाप्पाच्या मूर्तीस फेटा बांधण्यासाठी बोलावतात. यंदाही डोंगरी वसतिगृह मैदान येथे विविध मूर्तींना फेटा घालताना दिसून आला.

Aslam Syed tying the idol of Bappa
Festival Unity: विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद मिलाद’ मिरवणूक! सलोख्याचे दर्शन; एकमेकांच्या मिरवणुकीचे स्वागत

केवळ एका दिवसात त्याच्याकडून ३०० फेटे बांधण्यात आले. दहा दिवसापासून मूर्तींना फेटे बांधण्याचे कार्य सुरू असल्याचे त्याने सांगितले.

चार भाऊ आणि वडील असे पाच जण अनेक वर्षांपासून फेटे बांधण्याचे काम करत आहे. बाप्पांना फेटे घालण्याचे काम मात्र तीन वर्षापासून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

"आपण फेटा बांधलेल्या बाप्पाच्या मुर्ती शहराच्या विविध भागात घरोघरी स्थापित केल्या केल्या जात आहे. त्यातून आर्थिक मदत होत आहे. त्यापेक्षा अधिक समाधान वाटत आहे. श्रद्धेत आणि आनंदात कुठलीही जातपात नसते. स्वतःसह इतरांचा आनंद यात सर्व काही आहे. याच हेतूने बाप्पाच्या मूर्तीस फेटे बांधण्याचे काम सुरू केले."- अस्लम सय्यद

Aslam Syed tying the idol of Bappa
Ganeshotsav : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.