पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील २० गावांमध्ये काटे की टक्कर ठरलेल्या सरपंच व सदस्या लढतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महत्त्वाकांक्षी सदस्यांनी आता उपसरपंचपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. (Fielding for deputy Sarpanch post begins tug of war in village with majority on edge Gram Panchayat Election nashik)
निवडून आलेल्या सदस्यांमधून ही निवड होणार असून काठावरचे बहुमत व अल्पमत असलेल्या गावांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास चिठ्ठीवर निर्णय न होता सरपंचांना मतदानाचा अधिकार असल्याने काही गावांत सरपंचाचे ही महत्त्व वाढणार आहे.
निफाड तालुक्यात गावगाड्याचे कारभारी ठरविताना मतदारांनी अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे. काही स्थानिक नेत्यांनी आपल्या गावचे गड शाबूत ठेवले. तर आमदार दिलीप बनकर यांचे पिंपळगाव बसवंत व मविप्रचे माजी सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या साकोरे मिग यांच्या गटाला घरच्या मैदानावर पराभवाचे हादरे बसले.
मतदारांनी काम करण्याची क्षमता, प्रामाणिक आणि गावासाठी झटणाऱ्या सदस्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे काही गावात सरपंच एका गटाचा तर सदस्य दुसऱ्या गटाचे असे समीकरण आहे. समानमते झाली तर सरपंचाना मोठा मान उपसरपंच निवडीत मिळेल.
केंदाकडुन आता थेट ग्रामपंचायतीना विकास निधी मिळतो. हा निधी खर्च करण्याचे सर्वाधिकार सरपंचांना आहेत. सरपंचाच्या अनुपस्थितीत हे अधिकार उपसरपंचांना असतात. त्यामुळे सरपंच इतकेच महत्त्व उपसरपंचांना आहे. हे महत्त्व ओळखूनच काही गावात या पदासाठी फिल्डींग लावली जात आहे. विशेषतः मोठ्या गावांतील या निवडीच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.
पिंपळगावला पाटील व लभडे आघाडीवर
चुरशीच्या तिरंगी लढतीत भास्करराव बनकर यांनी विजय साकारला. सरपंचपदी बनकर व १२ सदस्य दिव्य विकास पॅनलचे निवडून आलेले आहेत. मानाचे उपसरपंचपदासाठी आता चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी माजी पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी किरण लभडे यांच्या पत्नी रेखा लभडे यांचे नाव आघाडीवर आहे. पाटील व लभडे यांची दुसरी टर्म व ज्येष्ठता ही समान आहे.
पाटील यांच्या सासूबाई सरोज पाटील तर लभडे यांचे पती किरण लभडे यांनी सदस्यपद भूषविले आहे. त्यामुळे सरपंच भास्करराव बनकर, गटाचे नेते दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याची उत्सुकता आहे. दरम्यान, सरपंच बनकर हे पुढील पाच वर्ष आवर्तन पद्धतीने बहुतांश सदस्यांना उपसरपंचपदाची संधी देण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.