SAKAL Swasthyam : मधुमेह समज आणि गैरसमज, मधुमेह कसा टाळता येईल, आहार व स्थूलपणाचा मधुमेहाशी संबंध या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत ती सकाळ ‘स्वास्थ्यम’ संघाच्या वतीने शनिवारी (ता.१९) रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ ते ८ च्यादरम्यान होणाऱ्या ‘मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा!’ या परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळेत. प्रवेश विनामूल्य आहे. (fight with diabetes 19th Symposium and Yoga Mudra Workshop by Sakal Swasthyam nashik)
मधुमेह (डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाइप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाइप टू).
या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
रक्तातील साखर वाढू लागते तेव्हा शरीर काही संकेत देते. यात जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, दृष्टी कमकुवत होणे आणि वजन कमी होणे अशा काही लक्षणांचा समावेश असतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याशिवाय रक्तातील अनियंत्रित साखरेमुळे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांनाही हानी पोचते आणि अवयवांना रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. हे आपणास माहीत असते.
मात्र हा शरीरात अस्वस्था निर्माण करणाऱ्या मधुमेहासंदर्भातील समज आणि गैरसमज, मधुमेह कसा टाळता येईल, आहार व स्थूलपणाचा मधुमेहाशी काय संबंध या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी सकाळ स्वास्थ्यम संघाच्या वतीने परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळा होत आहे.
यात मुधेमहतज्ज्ञ, ऊर्जा उपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, ओबेसिटी व मधुमेहतज्ज्ञ आदी सहभागी होणार आहेत. प्रवेश विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे.
फोन बुकिंगसाठी २४०-२४७६२६१, २, ३ यावर संपर्क साधावा. या परिसंवादाचे हेल्थ पार्टनर शारंगधर, ऊर्जा पार्टनर निरामय वेलनेस सेंटर आहे. क्यूरकोड स्कॅन करा अन् सहभागी व्हावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.