नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळकेंची नाशिकनगरी ‘फिल्म इंडस्ट्री’ व्हावी म्हणून अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचे प्रयत्न चालले आहेत. आता नाशिकमध्ये तिसऱ्या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून, कलर्स मराठी वाहिनीवर ९ जानेवारी २०२३ पासून ही मालिका प्रसारित होण्यास सुरवात होईल. (Filming of third serial to become Nashik Film Industry Nashik News)
देवळाली कॅम्प भागात मालिकेच्या चित्रीकरणासाठी वाडा घेण्यात आला आहे. ‘पिरतीचा वणवा ऊरी पेटला’ या मालिकेचे चित्रीकरण इथे केले जात आहे. पोतडी इंटरटेनमेंटच्या मालिकेचे निर्माता निखील सेठ आणि दिग्दर्शक विनोद लवेकर आहेत. कार्यकारी निर्माता दत्तसंग्राम वासमकर, तर लाइन प्रोड्युसर कृष्णा मरकड आहेत. रसिका वाखरकर, इंद्रनील कामत, विजय शिंदे, सिमा गोगळे असे कलावंत भूमिका साकारत आहेत.
मालिकेचा ६० जणांचा ‘क्रू’ आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी श्री. उदगीरकर यांनी मदत केली आहे. कोरोनाचे नियम शिथील होत असल्याच्या काळात चित्रपटांपासून ते मालिकांपर्यंतच्या ‘प्रॉडक्शन हाउसेस’नी नाशिकमध्ये यावे म्हणून श्री. उदगीरकर यांनी मुंबईत पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण झाले. मखमलाबादमध्ये ‘सुंदरा मनात भरली' मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले. या मालिकेचे आतापर्यंत ८०० पर्यंत भागाचे चित्रीकरण झाले आहे.
उदगीरकरांची निर्मिती
श्री. उदगीरकर स्वतः कलावंत आहेत. त्याचवेळी त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. पाथर्डी फाटा भागात त्यांची निर्मिती असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. भगूरमध्ये ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचे चित्रीकरण झाले. नाशिकच्या कलावंतांसह पडद्यामागच्या कलाकारांना मालिका, चित्रपटांसाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा असा प्रवास करावा लागायचा.
मात्र नाशिकमधील सुंदर निसर्गराजी, छानसे हवामान, तंत्रज्ञांची उपलब्धता, छानशा निवासासह भोजनाची व्यवस्था, दळणवळणाची चांगली सोय अशा जमेच्या बाजूमुळे आता चित्रपटसृष्टीचा दिवसेंदिवस नाशिककडे कल वाढत चालला आहे. त्याचा वेग अधिक व्हावा, यासाठी श्री. उदगीरकर प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.