नाशिक : मध्य रेल्वेच्या मार्गावर मुंबई प्रवासात अडसर ठरणाऱ्या इगतपुरी-कसारादरम्यानच्या (Igatpuri Kasara) लोहमार्गावर मार्ग सपाटीकरणाच्या प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला (Survey) ६४ लाख रुपयांना रेल्वे बोर्डाने अंतिम मान्यता दिली आहे. इगतपुरी-कसारा अंतर १६ किलोमीटरचे असून, या भागात (१:१०० ग्रेडियंटचा) टनेल झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि दोन इंजिन लावण्याच्या बॅकरचा खर्चही वाचणार आहे. (Final approval for survey of Igatpuri Kasara tunnel Nashik latest marathi news)
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मध्य रेल्वेमार्गावरून शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते. एकट्या नाशिक रोड स्थानकातून पन्नासहून अधिक गाड्यांतून शेकडो प्रवासी प्रवास करतात. इगतपुरी ते कसारा हे १६ किलोमीटरचे अंतर असून, यादरम्यानच्या घाट परिसरात पूर्वीपासून असलेले टनेल कमी व्यासाचे आहे.
या घाटात कमी व्यासाच्या तसेच उंचसखलपणामुळे रेल्वेगाड्यांना वाढीव इंजीन, बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपुरी- कसारादरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाड्या थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो.
दोन मार्गांसह पाच हजार कोटींचा प्रस्ताव
कसारा ते इगतपुरीदरम्यान १.३७ ऐवजी १.१०० ग्रेडियंट क्षमतेचा मध्ये टनेल व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. याअनुषंगाने खासदार गोडसे यांची रेल्वे बोर्डासोबत बैठकही झाली.
प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यात सध्याचा दुहेरी लोहमार्ग चौपदरी करण्यासह उंचसखलपणा कमी करीत एकसलगपणा बोगद्याचा व्यास वाढविण्याचा ग्रेडियंट टनेलच्या अभियांत्रिकी सर्वेक्षणाच्या प्रस्तावास तात्पुरती मान्यता मिळाली.
रेल्वेबोर्डाने बुधवारी (ता. १३) इगतपुरी-कसारादरम्यानच्या लोहमार्गावर १:१०० ग्रेडियंट क्षमतेचा टनेल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अखेर अंतिम मान्यता देत ६४ लाखांच्या निधीला मंजुरी दिली.
डबल इंजीनचा प्रश्न
सध्या या भागात रेल्वेगाडीला दोन इंजिने लावाव लागतात. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे लवकरच टनेल प्रस्ताव सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून, घाट परिसरात अधिक व्यासाच्या टनेल उभारणीचा अभ्यास होणार आहे. तसेच कसारा घाटात रेल्वेगाड्यांना दोन इंजिने लावणे थांबणे बॅकरही लावण्याची गरज पडणार नाही. त्यातून वेळेची बचत होणार आहे.
"मध्य रेल्वेच्या मार्गावर टनेल उभारणीनंतर मुंबईहून कसारादरम्यान धावणाऱ्या उपनगरीय गाड्या (लोकल) नाशिकपर्यंत धावणे शक्य होणार आहे. तसेच इगतपुरी-कसारादरम्यान चौथी व पाचवी रेल्वेलाइन वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशानाच्या विचाराधीन आहे."
-हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.