येवला (जि. नाशिक) : लांबलेल्या बहुचर्चित पालिका निवडणुकीसाठी अखेर १३ प्रभागांची रचना निश्चित झाली आहे. या रचनेत शहरातील अनेक भाग इकडे-तिकडे सरकले असून, यामुळे काहींना एकगठ्ठा मतांचा लाभ होईल, तर काहींची हक्काची मते दुसऱ्याच्या प्रभागात गेल्याची स्थिती आहे. असे असले तरी निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का करून इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे.
येथील पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून, आरक्षण जाहीर होणार असल्याने सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडतीसाठी पालिकेने तयारी केली आहे. दरम्यान, शहराच्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्रभाग क्रमांक ५, ७, ९, १०, १२ व १३ संदर्भात सात हरकती घेतल्या होत्या. यातील सहा हरकती सुनावणीदरम्यान फेटाळण्यात आल्या. विष्णू कऱ्हेकर यांची हरकतीची दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने आता अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. या प्रभाग रचनेमुळे अनेकांची सोय, तर काहींची गैरसोय झाली आहे.
येथील पालिकेचे राजकारण मुस्लिमबहुल लोकसंख्या, समाजनिहाय गल्ल्या अन शहर व नववसाहतीची विभागणी यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोयीने प्रभाग असावा, या अपेक्षेत असतो. यापूर्वीच्या प्रभाग रचनेमध्ये अनेकांची गैरसोय झाली होती. शिवाय चार ते पाच वॉर्डामध्ये मुस्लिमबहुल लोकसंख्येचा पगडा होता. या वेळी मात्र नव्या रचनेत संपूर्ण चित्र बदलले असून, बहुतांश प्रभागात हिंदू-मुस्लिम वास्तव्याचा भाग आला आहे. शिवाय पूर्वीच्या प्रभागातील काही भाग कमी होऊन नव्याने तेरावा प्रभाग अस्तित्वात आला आहे. यामुळे दोन नगरसेवक वाढून संख्या २६ होणार आहे. शहराची लोकसंख्या ४९ हजार ८२६ झाली आहे.
■ अशी आहे नवी प्रभाग रचना..
(प्रभागनिहाय लोकसंख्या व व्याप्ती)
● प्रभाग एक : एकूण लोकसंख्या ४०४२ (अनूसूचित जाती- ५९८, जमाती- १९६). व्याप्ती : बाभूळगाव शिवार, संतोषीमाता मंदिर, मनमाड रस्ता, पाटोदा रस्ता, संतोषी माता मंदिर, कांदा मार्केट, भारतरत्न अटलबिहारी चौक, लक्कडकोट, संजय गांधीनगर, नाशिक महामार्ग, मित्रविहार कॉलनी, शहा हॉस्पिटल, पाबळे वस्ती, म्हसोबानगर, अंगणगाव नदीपर्यंत.
● प्रभाग दोन : एकूण लोकसंख्या ३६२६ (अनुसूचित जाती-१७९, जमाती- १२८). व्याप्ती : पालखेड कालवा, नांदूर रस्ता, जुने मामलेदार ऑफिस, मुक्तिभूमी, कचेरी रोड, पाणी टाकी, जालनावाली मस्जिद, आयना मस्जिद, अंबिया शाह कॉलनी, नगर-मनमाड महामार्ग.
● प्रभाग तीन : लोकसंख्या एकूण ३७९५ (अनुसूचित जाती-१८, जमाती-२९). व्याप्ती : वडगाव बल्हे रेल्वेलाइन, नागड दरवाजा रोड, मुलतानपुरा, मल्हार हाजी मस्जिद, अँग्लो ऊर्दू हायस्कूल मैदान.
● प्रभाग चार : लोकसंख्या- ३५२७ (अनुसूचित जाती २०४, जमाती- १२५). व्याप्ती : हिंदुस्थानी मस्जिद, नगरसूल रेल्वे चौकी, कोटमगाव रेल्वे लाइन, उड्डाणपूल, औरंगाबाद महामार्ग, साने गुरुजीनगर, नांदगाव रस्ता.
● प्रभाग पाच : लोकसंख्या- ३६९५ (अनुसूचित जाती १३५, जमाती- एक). व्याप्ती : कचेरी रस्ता, पक्की मस्जिद, मुलतानपुरा, नागडदरवाजा रस्ता, नांदगाव रस्ता, बुंदेलपुरा, ऋग्वेदी मंगल कार्यालय, आझाद चौक, देवी खुंट.
● प्रभाग सहा : लोकसंख्या- ४०७५ (अनुसूचित जाती १८८, जमाती-९१). व्याप्ती : भारत दाल मिल ,बुंदेलपुरा, नांदगाव रस्ता, ताज पार्क, कासार गल्ली, पिंजार गल्ली, पहाड गल्ली, लक्ष्मीनारायण रस्ता.
● प्रभाग सात : लोकसंख्या- ३९११ (अनुसूचित जाती ४३, जमाती-३८). व्याप्ती : श्रीकृष्ण थिएटर, जुनी पालिका रस्ता, होमगार्ड ऑफीस, तीन देऊळ, पहाड गल्ली, काळा मारुती रोड, शिंपी गल्ली, बुरूड गल्ली, मेन रोड, थिएटर रस्ता.
● प्रभाग आठ : लोकसंख्या- ३५४० (अनुसूचित जाती- ३११, जमाती- ६५). व्याप्ती : बसस्थानक परिसर, स्मशानभूमी रस्ता, वाहिद कॉलनी, परदेशपुरा, कचेरी रस्ता, जुनी पालिका कार्यालय, थिएटर रस्ता, इंद्रनिल कॉर्नर, एकनाथ खेमचंद पेट्रोलपंप, नगर-मनमाड महामार्ग.
● प्रभाग नऊ ः लोकसंख्या- ३९१६ (अनुसूचित जाती- ८१, जमाती-६३). व्याप्ती : बुरूड गल्ली, शिंपी गल्ली, काळा मारुती रोड, गंगादरवाजा रस्ता, गांधी मैदान, खंडेराव महाराज मंदिर, रघुजीबाबा बाग, दारू गुत्ता रोड.
● प्रभाग दहा ः लोकसंख्या- ३४२८ (अनुसूचित जाती- २२०, जमाती- ३६). व्याप्ती : डॉ. गायकवाड हॉस्पिटल, काबरा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, (कै.) भाऊलाल लोणारी व्यापारी संकुल, नगर परिषद नवीन व्यापारी संकुल, हाबडे यांचे रंगोली दुकान, पटेल मस्जिद, फत्तेबुरूज नाका, हुडको कॉलनी, विघ्नहर्ता हॉस्पिटल, वर्मा बंगला.
● प्रभाग ११ : लोकसंख्या- ३९२४ (अनुसूचित जाती- २८६, जमाती- ७०). व्याप्ती : महात्मा फुले नाट्यगृह, पालखेड कॉलनी, विंचूर रस्ता पाणी टाकी, रोकडे हनुमान मंदिर, बदापूर रस्ता, अंगणगाव नदी.
● प्रभाग १२ : लोकसंख्या- ४१५२ (अनुसूचित जाती- ५२९, जमाती- १९५). व्याप्ती : पारेगाव रस्ता, हुडको कॉलनी, हुतात्मा स्मारक, उपजिल्हा रुग्णालय, नाकोड पैठणी, चुना भट्टी, औरंगाबाद रस्ता, कोटमगाव रेल्वेलाइन, नांदेसर रस्ता, रेल्वे स्टेशन, बदापूर रस्ता, रोकडे हनुमान मंदिर, सुलभानगर, हुडकोनाला, पारेगाव रस्ता.
● प्रभाग १३ : लोकसंख्या एकूण ४१९५ (अनुसूचित जाती- ११२५, जमाती-५२१). व्याप्ती : डॉ. सोनवणे हॉस्पीटल, गांधी मैदान, गंगादरवाजा, लुटे किराणा, दत्त मंदिर, कासार गल्ली, विठ्ठलनगर, लक्ष्मीआई मंदिर, एचडीएफसी बँक, चुना भट्टी, एन्झोकेम हायस्कुल, तालुका क्रीडासंकुल, गुलाम हुसेन पेट्रोलपंप, बजरंग हॉटेल, सोपे स्वीट मार्ट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.