Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप

Rajya Balnatya Spardha
Rajya Balnatya Spardhaesakal
Updated on

नाशिक : येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १९ वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा सोमवारी (ता. ९) समारोप झाला. ६ ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक केंद्रावर झालेल्या या प्राथमिक फेरीत १५ संघांनी सहभाग नोंदविला. यापैकी १४ बालनाट्ये स्पर्धेत सादर झाली. (Finale of preliminary round of balnatya competition Rajya Balnatya Spardha nashik news)

पहिल्या सत्राच्या सुरवातीला के. के. वाघ शिक्षण संस्था, पंचवटीतर्फे ‘चिमटा’ हे नाटक सादर झाले. सुरेश पवार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना विनोद राठोड यांनी केले. श्रुती जंगम, सर्वेश काळे, अवनीश ठाकरे, साहिल मोरे, नितीन सोनवणे, श्रीरंग क्षत्रिय, सिद्धी चव्हाण, संयोगिता महाजन, आयुष इंगळे, समर्थ बरकले, सर्वज्ञ चव्हाण, गार्गी खालकर, चारुल चित्ते, राजेश्‍वरी देसले,

ओम अमृतकर, रुचिता धूम, अथर्व जासूद, आर्यन काळोखे, साई कुंभारकर या बालकलाकारांनी या नाटकात अभिनय केला. पुनम कुमावत यांनी नाटकाचे नेपथ्य तर प्रतीक्षा ठाकूर यांनी पार्श्‍वसंगीत साकारले. रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा विनीत घराटे यांनी साकारल्या. निकीता तांबट यांनी मंचवस्तू मांडणी केली. अमृता राव या नाटकाच्या निर्मिती प्रमुख होत्या.

यानंतर, इस्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूलतर्फे ‘अद्भुत बाग’ हे नाटक सादर झाले. सुजित जोशी यांनी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या नाटकात आदित्य गुंजाळ, खुशी धारणकर, आयुष गोऱ्हे, भावेश सोनवणे, चित्रेश वडगावकर, इशांत गिरासे, जीनल बेदमुथा, काव्या शास्त्री, मृणाल तेलंग, सक्षम भालेराव,

श्‍लोक गाडेकर, स्वरा मशालकर, अंतरा जाधव, तन्मय पाटील, यश्‍मीत देशपांडे, गौरी गडाख, सार्थक अमृतकर, अलिशा सोनवणे, वीर दिक्षीत, अश्‍विक देशमुख, अन्वय जोशी या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या. संदीप रत्नपारखी यांनी नाटकाचे नेपथ्य तर जयेश जोशी यांनी प्रकाशयोजना साकारली.

मिलिंद फडके यांनी नाटकाला संगीत दिले. माणिक कानडे यांनी रंगभूषा तर पूजा बच्छाव यांनी वेशभूषा साकारल्या. शीतल जाधव यांनी व्यवस्थापन हाताळले तर सचिन जोशी यांनी नाटकाची निर्मिती केली.

Rajya Balnatya Spardha
SAKAL Exclusive : प्राथमिक शिक्षकांच्या मदतीला Vinoba App!

दुपारच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र, नाशिकतर्फे ‘छोटीशी आशा’ हे नाटक सादर झाले. दीपक नारळे यांनी या नाटकाचे लेखन केले तर भरत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन अन् प्रकाशयोजना साकारली. प्रियदर्शनी साळुंखे, आकांक्षा कांबळे, समीक्षा व्हावळे, तेजस्विनी खाडे, सानिया परदेशी, तेजस्विनी निकम, अनुष्का वाघमारे, निकिता कसाब, निलम चौधरी, मानसी वाडविंदे या बालकलाकारांनी नाटकात अभिनय केला.

संदीप पांडे यांनी नेपथ्य तर राहुल कानडे यांनी नाटकाचे पार्श्‍वसंगीत साकारले. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा रूपाली जोपूळकर यांनी साकारल्या. यावेळी सूत्रधार म्हणून माधुरी जाधव यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक नितीन भुजबळ, विशाखा कसबे यांचे नाट्यनिर्मीतीसाठी सहकार्य लाभले.

यानंतर, दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिकतर्फे ‘माझे गीता रहस्य’ हे नाटक सादर झाले. दिवंगत रमेश रोकडे यांच्या मुळ एकांकिकेच बालनाट्यात रूपांतर गिरीश जुन्नरे यांनी केले. किरण कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले.

पूर्ती पारख, मैत्रेयी गायधनी, वेदिका पैठणकर, श्रावणी नांदुर्डीकर, गिरिजा वर्तक, कौमुदी जोशी, श्रेयस भडांगे, सई शुक्ल, गौरंग दिक्षीत, बेला गर्गे, रुद्र बागूल, धारा साकोरकर, अवधूत गवांदे, स्वरा काबरा या बालकलाकारांनी या नाटकात भूमिका साकारल्या.

ईशान घोलप यांनी नाटकाचे नेपथ्य तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना साकारली. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे यांनी साकारल्या. ऋचा गायधनी यांनी या नाटकाची निर्मिती केली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Rajya Balnatya Spardha
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; Padma Bhushan राम सुतार साकारताय 21 फूट उंच पुतळा

दरम्यान स्पर्धेच्या समारोपप्रसंगी, आत्मा मालिक इंग्लिश स्कूल गुरुकुल, पुरणगावतर्फे ‘सहल’ हे नाटक सादर झाले. अमोल संगीता अरुण लिखित या नाटकाचे दिग्दर्शन शरद ढोणे यांनी केले. सार्थक क्षीरसागर, सिद्धी बोराळे, आयुष वसावे, ओमकार शिंगाडे, सार्थक

शिंदे, शुभम खकाळे, पलक बधान, समीक्षा शेळके, अनुश्री पळवे, सार्थक पगारे, हर्षिता पाटील, अक्षदा कदम, ईश्‍वरी पडवळ, पार्थ बच्छाव, गौतमा पाडवी या बालकलाकारांनी नाटकात भूमिका साकारल्या.

सतीश जाधव यांनी नाटकाचे नेपथ्य तर चिंतामण पाटील यांनी प्रकाशयोजना साकारली. किशोर गायकवाड यांनी नाटकाला पार्श्‍वसंगीत तर शाम शिंदे यांनी संगीत दिले. रूपाली देशमुख यांनी रंगभूषा तर प्रवीण घोगरे यांनी वेशभूषा साकारली. हनुमंतराव भोंगळे यांनी नाटकाची निर्मिती केली.

आता उत्सुकता निकालाची

सोमवारी ५ नाटकांच्या सादरीकरणानंतर आता सर्व सहभागी संघांना अन् बालकलाकारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. नाशिक केंद्र समन्वयक राजेश जाधव यांनी संयोजन केले.

Rajya Balnatya Spardha
Made in Malegaon Fest : मालेगावी 3 फेब्रुवारीपासून मेड इन मालेगाव फेस्टिवल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.