विकास गिते
सिन्नर : जिद्द चिकाटी सतत परिश्रम करीत वडिलांनी केलेले शेती कामात परिश्रम आईचे कष्ट हे सर्व करीत असताना शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात.
अशाच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करीत राज्य कर निरीक्षक अधिकारी या पदासाठी पात्र ठरला आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश हे प्रेरणादायी व देदिप्यमान आहे.
(Finally success to tireless work of farmers parents nashik news)
ही कहाणी आहे सिन्नर तालुक्यातील मळहद्द या युवकाची अतिशय प्रतिकूल परिस्थिती सिन्नर शहरातील मळहद्द येथील विशाल संजय उगले या तरुणाने राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या निवडीबद्दल आप्तस्वकियांसह मळहद्द परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
विशालचे वडील संजय उगले सर्वसामान्य शेतकरी असून बिकट परिस्थितीतून त्याने हे यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नववी शिकलेले वडील व आठवी शिकलेली आई अनिता यांनी स्वतः अल्पशिक्षीत असूनही मुलांच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करुन सदैव प्रोत्साहन दिले. विशालनेही त्याची जाणिव ठेऊन आईवडीलांचे स्वप्न पूर्ण केले.
विशालचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मापारवाडी शाळेत झाले. त्यानंतर लोकनेते शं.बा. वाजे विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे मॅकेनिकल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. मागील ६ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यश एक दोन गुणांवरून हुलकावणी देत होते. मात्र, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्याने हे यश मिळवले.
अत्यंत हलाखीचे जीवन जगताना आईवडीलांनी पाहिलेले स्वप्न डोळ्यासमोर ठेवून विशालने मार्गक्रमण केले. विशालच्या यशात आई- वडील व बहिणीचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी विशालला आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. मुलगा अधिकारी झाल्याचे समजतात आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कुटुंबीयांच्या पाठबळामुळे हे यश मिळवण्यासा मदत झाली, अशा शब्दांत विशालने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपण संपूर्ण आयुष्यात तारेवरची कसरत सोसली. परंतु, मुलाला त्याच्या ध्येयापासून कधीच विचलीत होऊ दिले नाही. याची जाणीव ठेवत विशाल ने हि आपल्या आई-वडिलांचे व स्वत:चे स्वप्न पूर्ण केले. विशाल चा आदर्श घेत जिद्दीने प्रयत्न करीत तालुक्यातील युवकांनी अधिकारी बनावे, असा विश्वास संजय उगले कुटुंबीयांनी सकाळ यांच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केला.
''विशालने अधिकारी होऊन डोळ्यांचे पारणे फेडले आहे. आम्ही शेतीमध्ये दिवस रात्र कष्ट घेतले. विशालला शिकवले त्यांनीही आमच्या कष्टाचे चीज केले"-विशाल ची आई
''परिस्थिती संघर्ष करायला शिकवते कष्टाची भाजी भाकरी नवनवीन अनुभव देते. मी अशाच आई-बाबाच्या कष्टातून आज हे ध्येय गाठू शकलो. कोणतेही गोष्ट अशक्य नसून प्रयत्न केल्यास की यश हमखास मिळते.''-विशाल उगले, राज्य विक्रीकर अधिकारी
''आमचे कष्ट व विशालाची सचोटी आम्ही केलेली मेहनत या सर्वांवर विशालने मात करीत आज आमचे डोळ्याचे पारणे फिटले असल्याने. त्याने समाजाची सेवा करीत सिन्नर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर गाजवावे त्याच्या यशाने सिन्नरच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे.''-संजय उगले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.