Nashik District Bank : राज्य सहकारी बॅंकेकडून जिल्हा बॅंकेला अर्थसहाय्य; प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा परवाना धोक्यात आल्याने ही बॅंक वाचविण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
Nashik District Bank
Nashik District Bank esakal
Updated on

Nashik District Bank : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा परवाना धोक्यात आल्याने ही बॅंक वाचविण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

जिल्हा बॅंकेला राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून कमी व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची सहमती झाली असल्याचे बोलले जात आहे. (Financing by State Co operative Banks to District Banks nashik news)

याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूतोवाच केले असून, त्यादृष्टीने जिल्हा बॅंकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे सहकारमंत्री वळसे-पाटील यांनी शनिवारी (ता. २७) सहकार परिषदेसाठी नाशिक शहरात होते. या वेळी मंत्री वळसे-पाटील यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर जिल्हा बॅंक प्रशासक, अधिकारी यांची बैठक घेत आढावा घेतला.

यात त्यांनी बॅंकेच्या अॅक्शन प्लॅन, त्यावरील कार्यवाही, बॅंकेची वसुली, थकबाकी याबाबत सविस्तर आढावा घेतला. बॅंकेने वसुलीवर जोर द्यावा, सामोपचार योजनेत जास्तीत जास्त थकबाकीदारांना सामावून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जिल्हा बॅंकेची तब्बल दोन हजार १०० कोटींची वसुली थकल्याने बॅंक अडचणीत सापडली आहे.

वसुलीस मोठ्या थकबाकीदारांकडून मदत मिळत नसल्याने बँकेचा ‘एनपीए’ ७१.४५ टक्यांवर पोहोचला आहे; तर तोटा ९०० कोटींवर गेला. यामुळे आरबीआय कधीही बँक परवाना रद्द करू शकते, अशी परिस्थिती आहे. बॅंकेचा परवाना अडचणीत आल्यावर मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर आदींनी शासनाकडे धाव घेतली.

Nashik District Bank
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेचे आजी-माजी संचालक दोषी; उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचक वक्तव्यातून संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाशिक दौऱ्यात साकडे घातल्यावर मंत्री पवार यांनीही बॅंकेला सावरण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. यात जिल्हा बॅंकेला राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी राज्य शासनाने हमी द्यावी, अशी मागणी झाली होती. त्यादृष्टीने अनेकदा मंत्रालयात बैठकांचे सत्रही झाले. तसेच, वसुलीसाठी जिल्हा बॅंकेला ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार जिल्हा बॅंकेने नव्याने सामोपचार योजना लागू केली. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सहकारमंत्री वळसे-पाटील नाशिकमध्ये होते. त्यांनी जिल्हा बॅंकेची बैठक घेतली. राज्य सहकारी बॅंकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बॅंकेला ५०० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेला मदत मिळण्याची शक्यता वाढली.

बँक वाचविण्यासाठी साकडे

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, नाशिक जिल्हा बॅंक वाचवा, सहकार वाचवा, शेतकरी वाचवा चळवळीचे राजू देसले, जिल्हा बॅंक कर्मचारी युनियनने राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बँक वाचविण्यासाठी साकडे घातले. तसेच, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्याकडे मदतीचा हात मागितला.

Nashik District Bank
Nashik District Bank: कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंकेची नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना; जाणून घ्या सविस्तर

परिषदेत स्वागताध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांची असलेली जिल्हा बॅंक अडचणीत आली असून, तिला मदतीची गरज असल्याचे विशद केले. खासदार गोडसे यांनीही जिल्हा बॅंकेला आर्थिक भांडवल दिल्यास बॅंकेला मदत होईल, असे सांगितले. तसेच, बॅंकेच्या २१ कोटींच्या नोटा पडून असल्याने यावरही लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

राजू देसले यांनी मंत्री वळसे-पाटील यांना बॅंकेला ७१८ कोटींचे अर्थसहाय्य करण्याची मागणी केली. तर, जिल्हा बँक कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंकेला मदत करण्याची मागणी केली.

Nashik District Bank
Nashik District Bank: हजारो कोटींचे पीककर्ज देणारी जिल्हा बँक ‘अडीच कोटींवर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.