Nashik MD Drug Case : सामनगाव येथे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनंतर मोठे रॅकेट शहर गुन्हे शाखेच्या हाती लागले. या रॅकेटचे सोलापुरातील दोन कारखानेही नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत अकरा ड्रग्ज पेडलर्संना अटक केली आहे. परंतु अजूनही या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. (Finding main suspect in drug case nashik crime news)
प्रथमेश संजय मानकर (वय २१, रा. ईश्वरशक्ती, जगताप मळा, तरण तलावाजवळ, नाशिक रोड) या ड्रग्ज रॅकेटमधील अकराव्या संशयिताला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. गेल्या ७ सप्टेंबरला सामनगाव येथील म्हाडा बिल्डिंगजवळ गणेश शर्मा हा मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी आला असता, त्याला पकडून पन्नास हजार रुपयांचे १२.०५ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आले होते.
त्याला अटक करून चौकशी केली असता, त्याने आतिष उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज प्रकरणाचा तपास करून आतिष उर्फ गुड्ड्याला अटक केली. गुड्ड्याला ड्रग्ज पुरविणारा प्रथमेश मानकर तेव्हापासून परराज्यात पळून गेला होता.
दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) तो सिन्नर फाटा येथे येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी विशेष पथकातील पोलिस नाईक प्रदीप ठाकरे यांना मिळाली होती.
त्यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती कळविली असता, त्यांच्या सूचनेने सापळा रचून मानकरला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील आणखी संशयित अक्षय नाईकवाडे हा अजून फरारी आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती मोठे रॅकेट लागले. ११ ड्रग्ज पेडलर्स अटक केले आहेत, परंतु या रॅकेटचा मुख्य संशयित अद्यापही फरारी असून, त्याचा पोलिस कसून शेाध घेत आहेत.
अटकेतील संशयित
वैजनाथ सुरेश हावळे, गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे, प्रथमेश मानकर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.