Nashik News : कचरा वर्गीकरण न केल्याने 18 हजाराचा दंड

Team of Solid Waste Department while taking penal action against Karma Colony Society for non-segregation of waste
Team of Solid Waste Department while taking penal action against Karma Colony Society for non-segregation of wasteesakal
Updated on

जुने नाशिक : कचरा वर्गीकरण न केल्याप्रकरणी पूर्व विभागाच्या घनकचरा विभागातर्फे कर्मा कॉलनी सोसायटीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. (Fine of 18 thousand for non segregation of garbage Nashik News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Team of Solid Waste Department while taking penal action against Karma Colony Society for non-segregation of waste
Eat Right India Activity : श्री अन्नपूर्णा प्रसादालयास भोग प्रमाणपत्र प्रदान

महापालिका घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनात पूर्व विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट, स्वच्छता मुकादम गौतम पवार, रवी वाघमारे, विशाल जाधव, ज्ञानेश्वर अष्टेकर यांनी तपोवन रोड येथील कर्मा कॉलनी सोसायटीस भेट देत पाहणी केली. हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

रहिवाशांकडून कचऱ्याचे विलगीकरण केले नसल्याचे आढळले. श्री. शिरसाट यांनी दंडात्मक कारवाई केली. सोसायटीत सुमारे ६० कुटुंबीय राहतात. प्रत्येकास तीनशे रुपये प्रमाणे सुमारे १८ हजारांचा दंड केला.

वारंवार त्यांना कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच नोटीसदेखील बजावण्यात आली होती. सूचनांकडे दुर्लक्ष करत येथील रहिवाशांनी कचरा वर्गीकरण केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Team of Solid Waste Department while taking penal action against Karma Colony Society for non-segregation of waste
Hemant Godse | साखर कारखानदारीला केंद्राच्या धोरणाने चांगले दिवस : खासदार गोडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.