नाशिक : महापालिकेच्या (MNC) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सहा महिन्यात एकूण ५०७ केसेस नोंदविण्यात आली सून त्यांच्याकडून सात लाख ५० हजार ४०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. (fine of 7 and half lakhs on those doing unsanitary by Solid waste management nmc nashik news)
आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ हे ध्येय समोर ठेऊन महानगरपालिकेची कार्यवाही सुरु आहे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ, गर्दीची ठिकाणे येथे मनपाची पथके लक्ष ठेऊन आहेत.
अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसुल केला जात आहे. विलगीकरण न केलेला, आणि वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपवल्याबद्दल, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, रस्ते मार्गावर अस्वच्छता, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण होणे, पालापाचोळा, प्लास्टिक, रबर आणि सर्व प्रकारचा कचरा जाळणे,
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मैला टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे, जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशा कारणांमुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कारवाई मध्ये रस्ता अस्वच्छतेच्या अधिक केसेसची नोंद झाली आहे. एकूण १९७ केसेस असून ५७ हजार २६० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याखालोखाल सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी एकूण ११२ केसेस आहेत. त्यातून ३ लाख ९७ हजार ३६० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.