जुने नाशिक : मेनरोड परिसरातील फावडे लेन येथील राजेंद्र आंबेकर यांच्या तीन मजली वाड्यास बुधवारी (ता. २८) पहाटे सव्वाचारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र लाखांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे अचानक वाड्यास आग लागली. राजेंद्र आंबेकर आणि मुलगा अनिरुद्ध यांना आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून दोघे बाहेर आले. (Fire Accident 3 floor Ambekar wada caught fire Millions of losses Nashik Latest Marathi News)
अग्निशमन विभागास माहिती मिळताच अवघ्या काहीतरी काही मिनिटात ते घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन विजय शिंदे, किशोर पाटील, राजेंद्र पवार, सोमनाथ थोरात, विजय नागपुरे, शरद देटके, गणेश गायधनी, विजय चव्हाणके, विजय गायकवाड, नितीन मस्के, नंदू व्यवहारे, संतोष आगलावे, पी. बी. परदेशी, डी. एच. चंद्रमोरे आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. वाड्याच्या तळमजल्यावर मन्सूर पाटणवाला यांचे मालकीचे मोबाईल आर्ट फोटो फ्रेमचे दुकान आहे.
दुकानाच्या पाठीमागे दुसऱ्या घरात त्यांचे गोडाऊन आहे. गोडाऊनमधूनच आगीची सुरवात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या मजल्यावर मंगेश परदेशी यांचा स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. आगीत राजेंद्र अंबादास आंबेकर यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, मंगेश परदेशी यांच्या स्क्रीन प्रिंटिंगचे मशिनरी, संगणक, स्क्रीन पेंटिंगला लागणारे साहित्य, टी-शर्ट, तर मन्सूर पाटणवाला यांच्या मोबाईल आर्ट आणि फोटो फ्रेम दुकानातील मागील बाजूला असलेल्या गोडाऊनमधील फ्रेमसाठी लागणारा कच्चा माल संपूर्णपणे जळून लाखाचे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे वाड्यास लागून असलेल्या इमारतीलादेखील आगीने काहीसे कचाट्यात घेतले. इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पूजा मोरे यांची (एमएच- १५- डीपी- ५१०८) तसेच शीतल वाघ यांची (एमएच- १५- जीझेड- ५३९८) या दोन दुचाकी जळून नुकसान झाले.
दक्षतेमुळे अनर्थ टळला
अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी आगीवर पाण्याचा मारा केला. दरम्यान वाड्यातील पाच गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा टळला. मुख्यालय केंद्रावरील २, पंचवटी केंद्राचा १, पंचवटी विभागीय केंद्राचा १,सिडकोचा १,सातपूर केंद्राचा १ अशा एकूण सहा केंद्रावरील बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.