मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील द्याने शिवारातील युती प्रोसेस समोरील शकील अहमद रियाज अहमद यांच्या कॉटन वेस्ट गोदामाला आग लागली. शुक्रवारी (ता.२४) या भागातील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने आग नेमकी कशामुळे लागली याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
आगीत कॉटन वेस्ट, फुलका, प्लॅस्टिक पन्नी, लहान कापडाचे ताखे असा निकामी कपडा व प्लॅस्टिक, तसेच गोदामातील दुचाकी जळून खाक झाल्याने सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Fire at cotton waste godown in Dayane area 10 lakhs loss Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
द्याने शिवारातील युती प्रोसेस समोरील शकील अहमद रियाज अहमद यांच्या कॉटन वेस्ट गोदामाला आग लागली. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. कपडा व कॉटन वेस्ट असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. नजीकच्या यंत्रमाग कारखान्यालाही आगाची झळ बसली.
सुरक्षा वाऱ्यावर
उन्हाळ्यात शहर व परिसरातील प्लॅस्टिक व कापड वेस्ट गोदामाला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडतात. पत्र्याचे शेड अथवा जाळीचे कुंपण करून हे गोदाम केलेले असतात. येथे अग्निरोधक कुठलीही यंत्रणा व उपाययोजना केलेल्या नसतात. प्रसंगी अनेक गोदाम विनापरवाना उभारलेले असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.