सिन्नर (जि. नाशिक) : महावितरणच्या (MSEDCL) वावी येथील 11 केव्ही क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रात (Electricity Substation) आग लागल्याची घटना आज दि.21 दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पांगरी फिडरवर झालेल्या बिघाडाचा परिणाम कार्यालयातील यंत्रणेवर झाला. व त्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा (Power supply) अनिश्चित काळासाठी खंडित करण्यात आला. (Fire at MSEDCL Wavi substation Nashik news)
सकाळी अकरा वाजेपासून वावी परिसरात पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान पांगरी फिडरवर बिघाड होऊन वीज केंद्रातील केबल्स पेटल्या. कार्यालयात असलेल्या जुन्या व वापरात नसलेल्या पॅनल्स असलेल्या खोलीत ही आग पसरली. याठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या फिडर्स कडे जाणाऱ्या केबलचे जाळे असल्याने संपूर्ण खोलीत फटाके फुटल्यासारखे आवाज येऊ लागले व धुराचे लोळ निघू लागले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला तेव्हा कार्यालयात केवळ दोन कर्मचारी उपस्थित होते वसुली कामी सहाय्यक अभियंता अजय सावळे व सर्व कर्मचारी परिसरातील गावांमध्ये गेले होते कर्तव्य वरील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयात कळवले व सिन्नर येथून पूर्व भागात होणारा संपूर्ण वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले महावितरणच्या कार्यालयात आग लागल्याचे समजताच वावी गावातील तरुणांनी धाव घेतली तोपर्यंत श्री सावळे यांच्यासह इतर कर्मचारी देखील पोहोचले.
या सर्वांनी आवारात भरून ठेवलेल्या टाक्यांतील पाणी वापरून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सिन्नर येथील अग्निशमन विभागास श्री सावळे यांनी कळल्यावर अवघ्या 20 मिनिटांत बंब वावीत पोहोचला. या बंबाने घुमसणारी आग शमवली. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महावितरणची तांत्रिक टीम देखील वावीमध्ये दाखल झाली. मात्र, दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने या पथकास काम करायला अडथळे येत होते.
नवीन पॅनल्स सुरक्षित...
कार्यालयातील वीजपुरवठा नियंत्रित करणारे नवीन पॅनल्स या घटनेत सुरक्षित राहिल्याने मोठे नुकसान टळले. आज लागली त्या ठिकाणी महत्वाच्या केबल्स जळाल्याने वीजपुरवठा खंडित ठेवावा लागल्याचे सहाय्यक अभियंता श्री सावळे यांनी सांगितले. विजमिटर्ससह वीजचोरी कारवाईत जप्त करण्यात आलेल्या केबल्स, वॉटर हिटर आदी मुद्देमाल देखील या घटनेत जळून खाक झाला असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.