मालेगाव : शहरातील स्टेट बँक चौकातील चिंधडे बिल्डिंग मधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हर रूमला अचानक आग लागली. शाॅर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत सर्व्हर रूमची वायरिंग व यंत्रसामग्री जळून खाक झाली.
बुधवारी (ता. ११) सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे बॅंकेचे कामकाज आज दिवसभरासाठी विस्कळीत होणार आहे. (Fire breaks out in Central Bank of India server room is banking disturbed operations for day Nashik News)
बॅंकेच्या सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनीं बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी व अग्निशामक दलाला ही घटना कळवली. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी सुरक्षारक्षक व अधिकारी यांच्या मदतीने बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वार उघडले.
बॅंकेत असलेल्या तीन फायर इन्स्टिंग्युरने सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. बॅंकेच्या मुख्य कामकाज होत असलेल्या क्षेत्रात आग न पोहोचल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
सर्व्हर रूम जळाल्याने दुरुस्तीसाठी बॅंकेचे कामकाज दिवसभरासाठी बंद असेल. मनपा अग्निशामक दल केंद्रात व छावणी पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.