अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची 2 वर्षांपासून शारीरीक तपासणी नाही?

fire brigade
fire brigadeesakal
Updated on

नाशिक : अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची (fire brigade) दर सहा महिन्यांनी शारीरीक चाचणी (health test) घेणे बंधनकारक असताना पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ९२ कर्मचाऱ्यांची दोन वर्षांपासून कोरोनाच्या (corona virus) नावाखाली तपासणी झाली नसल्याची बाब समोर आली आहे. (fire-brigade-staff-no-health-test-for-two-years-nashik-marathi-news)

शारीरीक व्याधींची समस्या वाढण्याची चिन्हे

अग्निशमन सेवा अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी शारीरीक चाचणी करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु, दोन वर्षे होऊनही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची शारीरीक तपासणी झालेली नाही. दोन वर्षापूर्वी झालेल्या शारीरीक तपासणीमध्ये काही कर्मचाऱ्यांना डोळ्यांचे विकार होऊन चष्मा लावावा लागला. अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे वय पन्नासच्या पुढे असून, पुढील वर्षांपासून सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलात १५१ पैकी ५९ जागा रिक्त असून सध्या ९२ कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे अग्निशमन दलात रिक्त पदांची संख्या वाढणार असताना दुसरीकडे शारीरीक तपासणी न झाल्याने शारीरीक व्याधींची समस्या वाढण्याची चिन्हे आहेत.

निमित्त कोरोनाचे

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची शारीरीक तपासणी महापालिकेच्या बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात केली जाते. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही रुग्णालये कोविड केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तपासणीसाठी जाता येत नसल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांनी केला आहे. कोविडचा जोर ओसरल्यानंतर नियमित तपासणी केली जाईल, असा दावा करण्यात आला. माजी अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यातील एका चौकशीत कर्मचाऱ्यांची शारीरीक तपासणी न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनादेखील भविष्यात कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी तपासणी करावी लागणार आहे.

fire brigade
भाजपचा सुधाकर बडगुजर यांना ‘दे धक्का’!
fire brigade
मुकबधीर मुलाला अमानुषपणे चटके देणाऱ्या सावत्र आईला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.