Nashik News : शेणवड बुद्रुक येथे सिलिंडरच्या स्फोटाने आग

fire
fire esakal
Updated on

Nashik News : शेणवड बुद्रुक येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला मोठी आग लागली होती. शनिवारी (ता.८) मध्यरात्री अडीचच्या सुमाराला ही गंभीर घटना घडली.

यात अंदाजे १५ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घरास आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. (Fire due to cylinder explosion at Shenwad Budruk nashik news)

शेणवडचे सरपंच कैलास कडू यांनी तातडीने घोटी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तू खतेले, गांगुर्डे यांना माहिती दिली. घटनेची तात्काळ दखल घेत पोलिस घटनास्थळी हजर होऊन मदतकार्य करण्याबाबत सूचना दिल्या.

इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाला घटनास्थळी पाचारण करून आग विझवण्यात आली. इगतपुरी नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी नागेश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी विशेष सहाय्य केले. सिलिंडरच्या स्फोटामुळे आजुबाजूच्या घरांना मोठा हादरा बसला. नथू गिळंदे यांच्या घरावरही आगीचे गोळे पडले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

fire
Nashik News : बदलेल्या वातावरणाचा फळपिकांना फटका

या घटनेमुळे आजुबाजूच्या एक दोन घरांनाही यामुळे आग लागल्याने त्या घरांचीही आग विझवण्यात आली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर काशिनाथ त्र्यंबक कोकाटे यांचे असून ते कालच परगावी गेलेले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने तात्काळ आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच कैलास कडू यांनी केली आहे.

या प्रसंगी दत्तू कोकाटे, काळू दिवटे, भोरू दिवटे, कारभारी गिलांडे, सोमनाथ सारुक्ते, निवृत्ती गिळंदे, पांडुरंग गिळंदे, मिलिंद शिंदे, संदीप शिंदे, भरत गिळंदे, शिवाजी शिंदे, गौरव मुकणे, कारभारी कोकाटे, मुक्तीराम कोकाटे, नथू गिळंदे, वाळू रोंगटे, एकनाथ गिळंदे आदी ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

fire
Nashik News : सिन्नर- शिर्डी मार्गावरील टोलचा वाजला ढोल; वाहनधारकांना भुर्दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.