Nashik : औद्योगिक वसाहतीत 8 कंपन्यांमध्ये आग; 6 सिलिंडरचे मोठे स्फोट

fire in company
fire in companyesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) जे. पी. एंटरप्राइजेससह बी ८४ दातीर मळा येथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या आठ कंपन्यांमध्ये बुधवारी (ता. ८) दुपारी साडेचार वाजता लागलेल्या आगीमध्ये (Fire) लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. या ठिकाणी असलेल्या सहा सिलिंडरचे (Cylinder) मोठे स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Fire in 8 companies in ambad industrial estate Nashik News)

पावडर कोटिंग संबंधित हीट प्रोसेसिंग मशिनरीचा येथे वापर करण्यात येतो. कदाचित ओव्हर हीटिंगमुळे ही आग भडकली असेल, असा अंदाज अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी यांनी व्यक्त केला आहे. एकामागे एक या सहा व्यावसायिक १९ किलोच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. एक सिलिंडर वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पावडर कोटिंगचे साहित्य व कंपन्यांमधील माल जळून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या चार अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. या ठिकाणी कंपन्यांमध्ये पावडर कोटिंग, तसेच फॅब्रिकेशन कामे केली जातात.

fire in company
Nashik : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची शहरात जय्यत तयारी

पावडर कोटिंगसाठी लागणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या साठ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यातच एकामागे सिलिंडरचे स्फोट होऊन ज्वलनशील पदार्थांनी आगीच्या ज्वालांसह आकाशात धुराचे लोट निर्माण झाले. आगीत तयार मालासह, यंत्रसामग्री व इतर लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. सिडको अग्निशामक दलाचे रवींद्र लाड, अविनाश अविनाश सोनवणे, विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड सिडको आणि सातपूर येथील चार बंबांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, जेपी आणि आर्ट एंटरप्रायझेस, श्लोक, लायसर, चैतन्य, सिद्धिविनायक, टेक्नो इंडस्ट्रीज आदी कंपनीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सातपूर अग्निशामक केंद्राचे प्रदीप परदेशी यांनी दिली. या ठिकाणी आग विरोधक कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याचेदेखील त्यांनी नमूद केले आहे.

fire in company
आठवडे बाजारात टोमॅटो, कोथिंबीर @ ८०; सर्वच भाज्यांच्या दरांत तेजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.