Armyतर्फे गोळीबाराची प्रात्याक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई

Indian Amry
Indian Amryesakal
Updated on

नाशिक : देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूलच्या तोफखानातर्फे गुरुवारी (ता.६) नाशिक व इगतपुरी तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी सकाळी सहा ते दुपारी चारपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. (firing demonstration by military Entry into restricted area strictly prohibited Nashik Latest Marathi News)

Indian Amry
Dhule : सावकारांच्या जाचामुळे तरूणाची आत्महत्या

नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तऱ्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूर वैद्य, टाकेद बुद्रूक, धामणगाव, नांदगाव बुद्रूक, साकूर दुमाला, बेळगाव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली व कवडदरा ही गावे एक्स सेक्टर मधील धोक्याच्या पातळीत येत आहेत.

त्यामुळे गोळीबार प्रात्याक्षिकाच्या दिवशी व त्या वेळी धोक्याच्या हद्दीत प्रवेश करणे अथवा आपली जनावरे ठेवणे हा मॅन्युव्हर्स फिल्ड फायरिंग ॲण्ड आर्टिलरी प्रॅक्टिसेस कायद्यांतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी यांनी सांगितले.

Indian Amry
Ayushman Bharat Scheme : आयुष्यमान भारत योजनेच्या E- Cardसाठी विशेष मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()