नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढू लागला असून, जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण दगावला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना गेल्या १७ डिसेंबर रोजी रुग्णाचा मृत्यु झाला होता.
परंतु त्याचे अहवाल सोमवारी (ता.१) प्राप्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहरात पाच तर, ग्रामीणमध्ये ८ रुग्ण आहेत. (First corona patient dies 14 patients positive on first day of new year Nashik)
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील पुरुष रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना गेल्या १७ डिसेंबर रोजी मयत झाला होता. त्या रुग्णांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले असता, त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
त्याचप्रमाणे, नाशिकसह जिल्ह्यात रॅपीट टेस्टसह उपचारासाठी दाखल रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यानुसार, सोमवारी (ता.१) ८४ रुग्णांची तपासणी केली असता, त्यात १४ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
रुग्णालये.......आजची चाचणी.... कोरोनाबाधित.....मयत
नाशिक मनपा ....२०......५.......०
मालेगाव मनपा....३५.....१.....०
जिल्हा रुग्णालय....१२....०....०
जिल्हा .......१७......८......१
एकूण.....८४.....१४......१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.