तालुक्‍यातील 'या' ग्रामपंचायतीला सर्वप्रथम डिजिटल ग्रामपंचायतचा मान!

VLH20A00033_pr[1].jpg
VLH20A00033_pr[1].jpg
Updated on

नाशिक : (विल्होळी) गावातील घडामोडी, गावातील विकासात्मक कामे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांची माहिती, आरोग्यविषयक माहिती सरपंच,
उपसरपंच, सदस्य यांची माहिती विविध कार्यक्रमांचे छायाचित्र, व्हिडिओ या अँपवर बघायला मिळणार आहेत. यांसह गावातील व बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ ग्रामसभेत अँपद्वारे आपले मत नोंदवू शकतील. 

सर्वप्रथम डिजिटल ग्रामपंचायत

तालुक्‍यातील विल्होळी ग्रामपंचायतीने नाशिक तालुक्‍यात सर्वप्रथम डिजिटल ग्रामपंचायत होण्याचा मान मिळवला. सरपंच बाजीराव गायकवाड व ग्रामसेवक पगार, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विकासभिमुख पारदर्शक कारभारामुळे विल्होळी ग्रामपंचायतीला हा मान मिळाला आहे. ग्रोवन ग्रोटेक इंडस्ट्रीच्या ई-ग्रामप्रणालीमुळे विल्होळी ग्रामपंचायतीची जगभरात ओळख होणार आहे. 


विविध कार्यक्रमांचे छायाचित्र, व्हिडिओ या अँपवर

गावातील घडामोडी, गावातील विकासात्मक कामे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांची माहिती, आरोग्यविषयक माहिती सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची माहिती विविध कार्यक्रमांचे छायाचित्र, व्हिडिओ या अँपवर बघायला मिळणार आहेत. यांसह गावातील व बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ ग्रामसभेत अँपद्वारे आपले मत नोंदवू शकतील. 

करदेखील या अँपवरून ऑनलाइन भरता येणार 

डिजिटल ग्रामपंचायतीमुळे गावातील दवंडी देणे, ग्रामस्थांना आपल्या तक्रारी सरपंच अथवा संबंधित खातेनिहाय प्रमुखाकडे ऑनलाइन नोंदविता येणार आहे. याशिवाय वर्तमानपत्रातील बातम्या, शेतीविषयक सल्ला, व्यवसायविषयक जाहिराती, शेतीविषयक माहिती, शासन निर्णय, शासनाच्या योजना, विविध दाखले, हवामान, आरोग्यविषयक सल्ला यासंबंधीची माहिती, ग्रामपंचायतीचा करदेखील या अँपवरून ऑनलाइन भरता येणार आहे. 

गावाच्या विकासाला चालना

सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच संपत बोंबले, ताराबाई वाघ, नवनाथ गाडेकर, संजय गायकवाड, मंदाबाई थोरात, शोभा वाघ, उषा पवार, श्रीकृष्ण मते, सोमनाथ भावनाथ, संतोष आल्हाट, सुरक्षा गायकवाड, अर्चना थोरात, जानकाबाई चव्हाण, रेवूबाई आचारी, वरील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक बळिराम पगार, लिपिक मोतीराम भावनाथ यांनी चर्चा करून डिजिटल ग्रामपंचायतीचा ठराव पास केला. 
त्यास ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभले. अँपमुळे ग्रामस्थांचा वेळ वाचेल. यांसह निर्णय प्रक्रिया जलद होऊन गावच्या विकासाला चालना मिळेल, 
असे मत सरपंच गायकवाड यांनी व्यक्त केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.