First Soil Stabilization Road : पावसाळ्यात वाहून न जाणारा पहिला रस्ता नाशिक जिल्ह्यात!

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ते वासाळी रस्त्यासाठी ‘सॉईल स्टॅबिलायझेशन’चा वापर
First Soil Stabilization Road : पावसाळ्यात वाहून न जाणारा पहिला रस्ता नाशिक जिल्ह्यात!
esakal
Updated on

First Soil Stabilization Road : पावसामुळे सतत खचणाऱ्या भागात मजबूत रस्त्यांती निर्मिती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘सॉईल स्टॅबिलायझेशन’ हा रामबाण उपाय सापडला असून, राज्यातील पहिलाच रस्ता इगतपुरी तालुक्यात उभारला जात आहे. पिंपळगाव मोर ते वासाळी या दोन गावांमधील १३.८ किलोमीटर रस्त्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे.

पर्यावरणपूरक असलेल्या या रस्त्याच्या उभारणीस दोन वर्षांची मुदत असताना सहा महिन्यांत ५० टक्के काम पूर्ण झाल्याने एका वर्षात हा रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बांधकाम विभागाने ठेवले आहे. (First Soil Stabilization Road first road in Nashik district that does not flow during monsoon nashik)

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात सातत्याने पाऊस पडतो. त्यामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात किंवा उंचसखल भागामुळे रस्ते वाहून जाण्याची शक्यता अधिक असते.

त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाने ‘सॉईल स्टॅबिलायझेशन’च्या माध्यमातून सिमेंट कॉंक्रिटचा समांतर रस्ता उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून या रस्त्यासाठी ९८.०८ कोटी रुपये कर्ज घेतले आहे.

त्यातून कडवा नदीवरील शुक्लतीर्थ या ठिकाणी दोन पूल उभारले आहेत. त्यांची उंची पूर्वीपेक्षा दोन मीटरने वाढवली आहे. या कामांसाठी जास्त वेळ लागत असल्याने ती अगोदर पूर्ण झाल्याने आता रस्त्याच्या कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास येथील कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी व्यक्त केला.

‘सॉईल स्टॅबिलायझेशन’च्या तंत्रज्ञानातून रस्ता उभारण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने शासनाने त्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

First Soil Stabilization Road : पावसाळ्यात वाहून न जाणारा पहिला रस्ता नाशिक जिल्ह्यात!
Monsoon Update: वरुणराजाच्या हजेरीत 101 टक्क्यांचा ‘शॉर्टफॉल’! धरणातील जलसाठा 45 टक्के कमी

सॉईल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय?

उंचसखल भागात सिमेंट कॉंक्रिटचा समांतर रस्ता उभारण्यापूर्वी टाकण्यात येणाऱ्या मातीसोबत सिमेंटचा काही प्रमाणात वापर केला जातो. त्यातून माती आणि सिमेंट एकमेकांशी घट्ट जुळते व रस्ता वाहून जाण्याची शक्यता कमी होते.

या रस्त्याला खड्डे तर पडणार नाही, शिवाय वाहून जाणार नाही. १० वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार एस. ए. सावंत यांच्यावर असणार आहे.

"सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिला रस्ता नाशिकमध्ये उभारला जात आहे. वेळेपूर्वीच त्याचे काम पूर्ण होईल, यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत. सहा महिन्यांत अर्धे काम पूर्ण झाले असून, पुढील सहा महिन्यांत रस्ता पूर्ण होण्याचा विश्वास वाटतो."

- उदय पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक

First Soil Stabilization Road : पावसाळ्यात वाहून न जाणारा पहिला रस्ता नाशिक जिल्ह्यात!
Nashik News: ZP करणार 51 मॉडेल व्हिलेज; ग्रामस्तरावरील योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.