भारतातील पहिली तर जगातील पाचवी शस्त्रक्रिया मनमाडमध्ये यशस्वी

अस्थीरोगतज्ज्ञ(Orthopedist) डॉ. फहीम कुरेशी यांनी २३ वर्षीय रुग्णाच्या गुडघ्यावर अतिशय गुंतागुंतीची, दुर्मिळ व अवघड अशी शस्त्रक्रिया(Operation) क्रेकोसूचर तंत्रज्ञानाचा((Krekosucher technology) वापर करून यशस्वी केली.
operation in manmad
operation in manmade-sakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : येथील प्रसिद्ध अस्थीरोगतज्ज्ञ(Orthopedist) डॉ. फहीम कुरेशी यांनी २३ वर्षीय रुग्णाच्या गुडघ्यावर अतिशय गुंतागुंतीची, दुर्मिळ व अवघड अशी शस्त्रक्रिया(Operation) क्रेकोसूचर तंत्रज्ञानाचा(Krekosucher technology) वापर करून यशस्वी केली. ही भारतातील पहिली व जगातील पाचवी शस्त्रक्रिया ठरली असून, तिची जागतिक पातळीवरील जर्नल ऑफ अर्थोपेडिक केस रिपोर्टमध्ये(Journal of Orthopedic Case Report) नोंद झाली आहे. (The first surgery in India and the fifth in the world was successful in Manmad)

कायमचे अपंगत्व येणार अशी होती भीती

अजहर सय्यद याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी(Knee bowl) मोटारसायकल अपघातात(motorcycle accident) मांसपेशीपासून वेगळी झाली होती. त्याला पाय उचलता येत नव्हता आणि चालताही येत नव्हते. त्यामुळे कायमचे अपंगत्व(Disability) येणार, अशी भीती वाटत असतानाच डॉ. कुरेशी यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, या गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये(Treatment) शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान होते. अशा प्रकारची दुखापत ही दुर्मिळ असल्याने या शस्त्रक्रियासाठी कुठलेही मार्गदर्शन उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत डॉ. कुरेशी यांनी हे आव्हान स्वीकारले आणि पायाभूत माहितीच्या आधारे स्वतःचा अनुभव वापरत क्रेकोसूचर तंत्रज्ञानाचा(Krekosucher technology) वापर करून शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

operation in manmad
म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स : छगन भुजबळ

भारतात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच

भारतात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच झाली असून, संपूर्ण जगातही यापूर्वी फक्त चार रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक केस रिपोर्टच्या (International Journal of Orthopedic Case Report) टीमने या शस्त्रक्रियेचा वर्षभर अभ्यास(Case study) केला. त्यानंतर डॉ. कुरेशी यांनी केलेल्या शस्त्रक्रियेला आंतरराष्ट्रीय मान्यता देत तशी नोंद केली.

दरम्यान, जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक केस रिपोर्टच्या मार्च २०२१च्या अंकात डॉ. कुरेशी व त्यांच्या सहाय्यक डॉ. ईरम खान आणि डॉ. ए. जी. कुरेशी यांचीही नावे प्रकाशित झाली आहेत. डॉ. कुरेशी यांनी या यशाचे श्रेय मातोश्री शहनाज कुरेशी यांना दिले. विशेष म्हणजे, जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक केस रिपोर्टमधील माहितीच्या आधारे आता अमेरिकेतील ग्लोबल जर्नलतर्फे(Global Journal of America) डॉ. कुरेशी यांचे हे संशोधन नि:शुल्क प्रकाशित करणार आहे. या यशाबद्दल डॉ. कुरेशी यांचे अभिनंदन होत आहे.

डॉक्टरांच्या रूपाने भेटले देवदूत

डॉ. कुरेशी केवळ शस्त्रक्रिया करून थांबले नाहीत, तर त्यांनी नंतरच्या काळातही रुग्णाकडून नियमित व्यायाम करून घेतला. त्याला हिंमत दिली. त्यामुळे हा तरुण आज सामान्य माणसासारखा चालू शकतो, उठू-बसू शकतो. डॉ. कुरेशी यांच्या रूपाने त्यांना देवदूतच भेटले, अशी प्रतिक्रिया रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

operation in manmad
PM CARES Fund : उस्मानाबादकरांनाे! जिल्ह्यातील व्हेंटिलेटर पडलेत धूळ खात

''गुडघ्याला दुखापत झाल्याने मला चालताही येत नव्हते. पायात जीव राहिला नव्हता. मात्र डॉ. कुरेशी यांनी त्यावर शस्त्रक्रिया केली, योग्य व्यायाम करून घेतला, तसेच धीर व हिंमत दिली. त्यामुळे आज मी चालू शकतो, बसू शकतो इतकेच नव्हे, तर माझी शस्त्रक्रिया ही भारतातील पहिली व जगातील पाचवी ठरल्याचा आनंद आहे.''

-अजहर सय्यद, रुग्ण

रुग्ण आपल्याकडे आले, म्हणून भारतातील पहिली व जगातील पाचवी अशी दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली. ती यशस्वी केल्याचा आनंद आहे. रुग्णाच्या गुडघ्याची वाटी मांसपेशीपासून वेगळी झाली होती. क्रेकोसूचर तंत्रज्ञानाचा वापर करून ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्यामुळे वाटी व मांसपेशी जोडल्या गेल्या.

- डॉ फहीम कुरेशी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, मनमाड

operation in manmad
''कोव्हॅक्सिनच्या पुण्यात तयार होणाऱ्या 50 % लसी महाराष्ट्राला द्या''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.