अंबासन (जि. नाशिक) : कजवाडे (ता. मालेगाव) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरपंच दीपाली सागर भामरे यांच्या प्रयत्नातून आठवडी बाजार भरला. भाजीपाल्यासह इतर वस्तूंसाठी स्थानिकासह परिसरातील गावातील नागरिकांना वीस ते पंचवीस किलोमीटर पायपीट करावी लागत होती. गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने त्रास आणि वेळ वाचणार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह स्थानिकांनी स्वागत केले आहे. (first time after independence weekly market was held in Kajwade Nashik Latest Marathi News)
काटवण परिसरातील कजवाडे येथे सरपंच दीपाली भामरे यांनी काही दिवसांपूर्वीच सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहिणींसह स्थानिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण गावातच आठवडे बाजार भरावावा, यासाठी उपसरपंच सुनील पगार, सदस्या छाया सोनवणे, ज्ञानेश्वर कापडणीस, विजय कापडणीस, सुरेश भामरे, कैलास कापडणीस, भिला कापडणीस, मोहन जाधव, वासुदेव बोरसे, मधुकर पंजाबी यांचे सहकार्य घेऊन सरपंच भामरे यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
याच अनुषंगाने परिसरातील कजवाडे, पोहणे, महड, रामपुरा, भडगाव आदी गावांना लाऊड स्पीकरच्या माध्यमातून शनिवारी (ता. १२) आठवडे बाजार कजवाडेत भरणार असल्याबाबत दंवडी दिली होती. त्यामुळे गाव व परिसरातील भाजीपाला उत्पादक, किराणा, भेळभत्ता विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. प्रथमच गावात बाजार यशस्वीरीत्या झाल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कजवाडेत दर शनिवारी आठवडे बाजार भरणार असल्याने स्थानिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुखकारक ठरणार असल्याने स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मदतीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडे बाजाराची सुरवात केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
"माझ्या प्रयत्नांना प्रतिसाद देत सर्व ग्रामस्थ व भाजीपाला विक्रेते आले. बाजार अगदी मोठ्या प्रमाणात भरला. त्याबद्दल मी आभार मानते."- दीपाली भामरे, सरपंच, कजवाडे
"सरपंच भामरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. त्यामुळे आमचा संपूर्ण भाजीपाला संपला गावातच भाजीपाला विक्रीसाठी बाजार उपलब्ध झाला."
- सायजाबाई पवार, भाजीपाला विक्रेत्या
"कजवाडे येथे आठवडे बाजार सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांना शेतीतील भाजीपाला विकण्यास अत्यंत सुलभ झाले आहे."- विशाल कचवे, भाजीपाला उत्पादक, कजवाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.