Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण

Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण
sakal
Updated on

Nashik News : येथे नवीनच सुरू झालेल्या बॉर्निओ माता आणि बाल रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण (अंडरवॉटर डिलिव्हरी) गुरुवारी (ता. २) डॉ. श्रद्धा सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

संध्या गायकवाड या प्रसूतीसाठी बॉर्निओ माता आणि बाल रुग्णालयात दाखल झाल्या. प्रसूतीपूर्व वेदना असल्याने त्यांना तत्काळ लेबर रूममध्ये हलविण्यात आले. (First underwater birth in North Maharashtra nashik news)

बॉर्निओ रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीसाठी प्राधान्य दिले जाते. संध्या गायकवाड यांना डॉक्टरांनी पाण्याखालील प्रसूतीविषयी व त्याच्या विलक्षण फायद्यांविषयी समजावून सांगितले. नातेवाईक आणि गर्भवतीच्या संमतीनंतर महिलेला बरदिंग टबमध्ये प्रसूतीसाठी हलविले. यानंतर दुपारी बाळाचा जन्म झाला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

डॉ. सबनीस माहिती देताना म्हणाल्या, की लेबर रूममधील प्रसूती आणि पाण्याखालील प्रसूती यातील मोठा फरक लक्षात घेतला तर पाण्याखालील प्रसूती ही आईसाठी अत्यंत आरामदायी आहे. या प्रसूतीदरम्यान पाण्याच्या तापमानाचे सतत निरीक्षण केले जाते. या गरम पाण्यामुळे आईच्या सांध्यांवर आणि स्नायूवर दबाव येत नाही.

Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण
Lalit Patil Drug Case: ललित पाटीलकडून 3 किलो साेने जप्त; पुणे पोलिसांकडून नाशिकमध्ये कसून चौकशी

तसेच, पाण्याच्या स्पर्शाने मानसिक ताणही कमी होतो. प्रसूतीच्या वेदनांचा प्रभावही कमी होतो आणि प्रसूती अतिशय सोप्या पद्धतीने पार पडते. प्रसूतीसाठी बॉर्निओच्या ऑपरेशन थिएटरमधील सर्व स्टाफ व डॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अवघ्या दोन महिन्यांआधी सुरू झालेले बॉर्निओ हॉस्पिटल हे एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहे.

‘बॉर्निओ’चे चेअरमन आणि मॅनिजिंग डायरेक्टर डॉ. संतोष मद्रेवार म्हणाले, की विशेषज्ज्ञ टीमच्या समर्थनाने प्रत्येक पावलावर आपल्याला सुरक्षित वाटावे आणि सामान्य प्रसूतीचा आनंद घेता यावा, यासाठीच्या सर्व सोयी-सुविधा आम्ही या हॉस्पिटलमध्ये पुरवीत आहोत. आपली आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी आमचे शीर्षप्राधान्य आहे.

Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण
Fraud Crime: योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्थेत गैरप्रकार; डॉ अद्वय हिरेंसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.