SPPU Management Council Election: व्‍यवस्‍थापन परिषदेवर प्रथमच बिनविरोध निवड; नाशिकच्‍या चौघांची माघार

SPPU university
SPPU universityesakal
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेवर सदस्‍यपदासाठीची निवडणूक इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली. माघारीचा दिवस असलेल्या गुरुवारी (ता. २) अनेक अधिसभा सदस्‍यांनी माघार घेतल्‍याने बिनविरोध निवड झाली.

नाशिकचे‍ डॉ. अपूर्व हिरे यांच्‍यासह अन्‍य तिघांनी माघार घेतली. व्‍यवस्‍थापन परिषदेवर निवड झालेल्‍या सात सदस्‍यांमध्ये नाशिक जिल्ह्यातून सागर वैद्य हे एकमेव सदस्‍य आहेत. (First unopposed election to SPPU Management Council Election Retreat of four of Nashik candidate news)

व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍यपद निवडीसाठी बुधवारी (ता. १) अर्ज छाननी होऊन गुरुवारी (ता. २) अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्‍यानुसार अनेक उमेदवारांनी आपले अर्ज निर्धारित वेळेत मागे घेतले.

व्‍यवस्‍थापन प्रतिनिधी पदासाठी राखीव प्रवर्गात एक जागेचा समावेश होता. परंतु, या जागेवर अधिसभा सदस्‍यच निवडलेला नाही. त्‍यामुळे व्‍यवस्‍थापन परिषदेवरदेखील ही जागा रिक्‍त राहिली.

उर्वरित सात जागांवर बिनविरोध निवड झाली असून, इतिहासात प्रथमच व्‍यवस्‍थापन परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्‍यामुळे ११ मार्चला मतदानाची आवश्‍यकता राहिलेली नाही.

माघार घेतलेले नाशिकचे उमेदवार

संस्‍था प्रतिनिधींच्‍या गटातून डॉ. अपूर्व हिरे, प्राचार्य गटातून डॉ. संपत काळे, डॉ. राजेंद्र भांबर यांनी, तर नोंदणीकृत पदवीधर गटातून ॲड. बाकेराव बस्‍ते यांनी अर्ज मागे घेतले.

थेट मंत्रालयात खलबत्ते...

यापूर्वी नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सदस्‍यपदाच्‍या निवडणुकीत यंदा प्रथमच थेट राजकीय हस्‍तक्षेप बघायला मिळाला होता. त्‍यातच व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य निवडीसाठीदेखील थेट मंत्रालयात खलबते बघायला मिळाली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

SPPU university
Ideal Wedding : वणीत मुस्लिम समाजात आदर्श विवाह; पाहण्याच्या कार्यक्रमातच आटोपला निकाह!

अधिवेशन सुरू असल्‍याने हेवीवेट नेते तेथे आहेत. व्‍यवस्‍थापन प्रतिनिधी गटातून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्‍यात लढत होणार होती. यांसह अन्‍य विविध गटांमध्ये पेच होता. त्‍यामुळे बिनविरोध निवडीत ज्‍येष्ठ नेत्‍यांची मध्यस्थी‍ फळाला आल्‍याचे समजते. व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य * व्‍यवस्‍थापन प्रतिनिधी गट- राजेंद्र विखे-पाटील * प्राचार्य गट- नितीन घोरपडे, देवीदास वायदंडे * अध्यापक गट- धोंडिराम पवार, संदीप पालवे * नोंदणीकृत पदवीधर गट- सागर वैद्य, भाग्‍यश्री मंठाळकर. "माझ्यासारख्या अराजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या युवकाला ‘अभाविप’ने संधी दिली. विद्यापीठ विकास मंचाचे नेते राजेश पांडे यांच्या नेतृत्वामुळे इतिहासात प्रथमच ही निवडणूक बिनविरोध झाली. यापुढे विद्यापीठाचा कारभार विद्यार्थिकेंद्रित होण्यासाठी काम करणार. नाशिक उपकेंद्र विद्यापीठ कॅम्पस म्हणून नावारूपाला आणण्याचे लक्ष्य असेल." -सागर वैद्य, नवनिर्वाचित व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

SPPU university
Postal Department : मालेगाव टपाल विभागाने गाठला लाखाचा टप्पा! बचत खाते उघडण्याचा नवा उच्चांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.