चांदोरीत झळकले 'उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे' चे फ्लेक्स

Flax
Flaxesakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : शिवसेनेतील बंडाळी चे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले असून ठीक ठिकाणी शिवसेनेच्या (Shiv sena) वतीने मोर्चे तोडफोड होत असतांना निफाड तालुक्यातील चांदोरी या ठिकाणी जिल्हा परिषद (ZP) सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी नाशिक औरंगाबाद मार्गावर लावलेला फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे. (flex of uddhav thackeray support by ncp flashed in chandori Nashik News)

निफाड तालुका तसा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, निफाड तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अधिकृत भूमिका उमटली नसली तरी राष्ट्रवादी च्या वतीने सिद्धार्थ वनारसे यांनी घेतलेली भूमिका मात्र लक्ष वेधून घेत आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक केंद्र बिंदू होते आताही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अंतर्गत बंडाळी मध्ये शरद पवार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सर्वोतोपरी मदत करत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार व स्व बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत होती,फ्लेक्स वरील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बोलका फोटो प्रिंट केला असू न कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Flax
आमदार निधीतून आता एका कामाला 50 लाखांचा खर्च!

"एकीकडे शिवसेना अंतर्गत बंडाळी निर्माण झालेली असतांना राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांना दाद देण्यासारखी परिस्थिती आहे.त्यामुळं शिवसैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आला आहे." - सिद्धार्थ माणिकराव वनारसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, चांदोरी

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून लावले गेलेलं हे फ्लेक्स म्हणजे महाविकास आघाडी किती भक्कम आहे याचं एक उदाहरण आहे काही आमदार प्रलोभनांमुळे जरूर फुटले असतील पण कार्यकर्ते अजूनही शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे एकसंघ आहेत उभे आहेत." - योगेश सावंत, बारामती

Flax
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप; सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.