Nashik Flood News : पुरातील मृतांची संख्या 10; 3 मृतदेहच यंत्रणेच्या हाती

Nashik Flood Latest Marathi news
Nashik Flood Latest Marathi newsesakal
Updated on

नाशिक : शहर-जिल्ह्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू (Death) झाला. त्यापैकी वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले. आज (ता.१५) सुरगाण्यात गंगाराम तुळशीराम चौधरी (वय ६०) हे वाहून गेलेत.

तसेच आळंदी, भावली, वाघाड, तिसगाव, वालदेवी, हरणबारी, केळझर अशी ७ धरणे ‘ओव्हरफ्लो‘ झाली आहेत. गौतमी-गोदावरी, कश्यपी, करंजवण, पुणेगाव, मुकणे, कडवा, भोजापूर, गिरणा ही आठ धरणे सत्तर टक्क्यांहून अधिक भरली आहेत. जिल्ह्यातील धरणसाठा ८० टक्के झाला आहे. (Flood death10 3 dead bodies in hands of system Nashik latest marathi news)

यंत्रणेला वाहून गेलेल्यांपैकी विशाखा लिलके (वय ६), पळशी खुर्द ते चिखली दरम्यान नाल्यात वाहून गेलेला आणि त्र्यंबकेश्वर येथील वाघमारे अशा तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले. दरम्यान, आज दुपारच्या तासाभराच्या विश्रांतीनंतर संततधार सुरु होती. संततधार पावसामुळे जमिनीत वापसा नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्या आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

पश्‍चिम पट्यातील पाणलोट क्षेत्रासह तालुक्याचा परिसर संततधारचा केंद्रबिंदू राहिला. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी आज घोटविहिरा व उंबरमाळ (ता.पेठ) येथील शंभर मीटर रस्त्याला गेलेले तडे गेले आणि माती ढासळण्यासह उन्मळून पडलेली झाडे याची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक वारूळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

घोटविहिरा व उंबरमाळ गावाला लागून असलेल्या दरीच्या खालच्या भागात माती ढासळल्याने रस्त्याला तडे जाणे व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्याने त्या भागात वास्तव्यास असलेल्या दहा कुटुंबांचे घोटविहिरा गावातील रिकामी घरे, समाज मंदिरात व खरपडी आश्रमशाळेत स्थलांतर करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने जिल्हाधिकारी पेठला रवाना झाले.

Nashik Flood Latest Marathi news
Monsoon News : बेघरांनी घेतला गणेशवाडी भाजी मंडईचा आसरा

रामसेतूचे स्ट्रक्चरल ऑडिट

गोदावरी नदीवरील रामसेतूला तडे गेल्याने त्या पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट' करून घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संबंधित पुलावर वाहतूक होत नाही.

वाहतुकीसाठी बंद असलेल्या या पुलाचा गर्दुल्यांकडून वापर होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. तसेच पूल धोकादायक असल्यास जीवितहानी टाळण्यासाठी तो पाडावा का? अशी एक मागणी पुढे येत असल्याने पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १६८.८ टक्के पाऊस

जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासापर्यंत १६८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-०२ (१९६.२), बागलाण-१.१ (२०४.८), कळवण-१०.२ (२७३.४), नांदगाव-०.३ (१५८.४), सुरगाणा-५६.१ (२२५), नाशिक-२१.१ (१६४.४), दिंडोरी-२४.२ (३२९.५), इगतपुरी-५८.८ (७६.७), पेठ-९१ (२५१.४), निफाड-५.९ (२०८.८), सिन्नर-४.३ (१३२.८), येवला-०.८ (१२७.८), चांदवड-३.३ (२३८.७), त्र्यंबकेश्‍वर-६२.८ (१४१.४), देवळा-१.८ (२२४.६).

धरणांमधून सोडण्यात येत असलेला विसर्ग

(आकडे क्यूसेस मध्ये दर्शवतात)

धरणाचे नाव विसर्ग

दारणा १० हजार ६७०

गंगापूर ७ हजार १२८

कडवा ३ हजार २३३

आळंदी ९६१

नांदूरमधमेश्‍वर ३७ हजार ४४५

भावली ७०१

पालखेड ७ हजार ९५०

करंजवण १ हजार ३५२

वाघाड २ हजार ७४५

तिसगाव ४०

पुणेगाव ६५३

चणकापूर ३ हजार ६१४

हरणबारी २ हजार १०४

केळझर ८३९

(नाशिकमधील गोदावरीवरील होळकर पुलाखालून १० हजार ५०२ क्यूसेस विसर्ग)

Nashik Flood Latest Marathi news
Degree अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ; तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.