Nashik Drama Competition: नाट्य स्पर्धांमध्ये नवीन संहितांवरच भर! बाल 3, राज्य नाट्यात 8 नवीन नाटके

Drama
Drama esakal
Updated on

Nashik Drama Competition : नाशिक केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आठ नवीन संहिता, बाल नाट्य स्पर्धेत तीन नवीन संहिता सादर झाल्याने नवीन संहितांवरच गत नाट्य स्पर्धेत भर राहिला. यंदाही हाच ‘ट्रेंड’ कायम राहील, असा अंदाज आहे. (Focus on New Codes in Drama Competitions Child Play 3 8 new plays in state theatre nashik)

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘साधू संत येती घरा’सारखे हलके-फुलके विनोदी, ‘ये मामला फिरसे गडबड हैं’ सारखे फार्सिकल, उमलत्या वयातील प्रेम असा तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय मात्र भरकटत चाललेल्या तरुणाईला उचित संदेश ‘इशक का परछा’मधून देण्यात आला; तर ‘श्रॉडीगर्स कॅट’मधून कुविख्यात आंतरराष्ट्रीय गुंडाभोवती फिरणारे कथानक मांडण्यात आले.

शेतकऱ्यांच्या जीवनातील बाप- मुलाच्या नात्याची गोष्ट ‘चांदणी’ नाटकातून अत्यंत संवेदनशीलरीत्या सादर झाली. ‘राशोमोन’सारखा एक जुनाच विषय पुन्हा नव्या भारतीय स्वरूपात रंगमंचावर आला.

‘झुंजार’सारख्या बालनाट्याने बालनाट्याच्या चौकटीच्या पलीकडे जात कर्करोगासारख्या रोगाशी झुंज देणाऱ्या शाळकरी मुलीची कथा मांडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drama
SAKAL Swasthyam: मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा; ‘स्वास्थ्यम‌’तर्फे 19 ला परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळा

नवीन बालनाट्य स्पर्धेतील नाटके : पुन्हा नको रे बाबा, झुंजार, पिढीजात. राज्य नाट्य : साधू संत येती घरा, चांदणी, इशक का परछा, फ्रीडम ७५, रिबाऊंड, ये मामला फिरसे गडबड है, श्रॉडीगर्स कॅट, राशोमोन.

वैविध्यपूर्ण विषय

गेल्या वर्षीच्या राज्य नाट्य आणि बालनाट्य स्पर्धा पाहता नवीन संहितांचे लेखन करून सादरीकरण करण्यात आले. वर्षभर राज्यातील विविध स्पर्धांत प्रयोग सादर केले जात आहेत.

स्पर्धा, प्रायोगिक रंगभूमीवर ही नाटके प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. विशेष म्हणजे या सर्व संहितांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात आल्याचे दिसून येते. या निमित्ताने अनेक नवोदित लेखकांना संधी आणि व्यासपीठ मिळाले.

"नवीन संहितेतून विविध विषय हाताळण्यात आले. नवोदित लेखकांना संधी आणि व्यासपीठ मिळाले. बाल नाट्यात तीन, राज्य नाट्यात आठ नवीन नाटके सादर झाली असून, यंदाही हीच स्थिती कायम असेल, असा अंदाज आहे." - श्रीराम वाघमारे, नाशिक

Drama
Success Story: हसत-खेळत, पण शिस्‍तीत केला अभ्यास! दिशाने उलगडले राष्ट्रीय स्‍तरावर ऐतिहासिक कामगिरीचे गमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.