देवळा : कसमादेच्या पूर्व भागात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामाची होरपळ झाल्याने धान्य उत्पादन तर नाहीच शिवाय जनावरांची भूक भागावी म्हणून कळवण व इतर सधन भागातून रोज शेकडो ट्रॉली मक्याचा चारा श्रमाच्या, तसेच पैशांच्या मोबदल्यात या दुष्काळी भागात नेला जात आहे. (Fodder in exchange for labor to live livestock Prices increased Horpal of drought area Nashik News)
कसमादे पूर्व भागात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमालाचे उत्पादन तर आलेच नाही, शिवाय जनावरांसाठी चारा सुद्धा आला नाही. नद्या, विहिरी, धरणे कोरडीठाक असल्याने शेतीची कामे ठप्प आहेत.
यामुळे उत्पादनाचे स्रोत नसल्याने या भागातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. घरात धान्य नाही, हातांना काम नाही आणि जनावरांना चारा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या भागातील बहुतेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय करतात. परंतु यंदा पावसामुळे पिकांची होरपळ झाल्याने चारा पण मिळाला नाही. यामुळे जनावरे जगवण्यासाठी स्वतःच्या श्रमाच्या मोबदल्यात शेतकरी चारा मिळवत आहेत.
तर काहींनी विकत घेतला आहे. चाऱ्याची मागणी वाढल्याने त्यांचे भावही आता वाढले आहेत. ३ हजार ते ५ हजार रुपये ट्रॉली असे या चाऱ्याचे भाव वधारले आहेत. ट्रॅक्टरला दोन, दोन ट्रॉली लावत दररोज चाऱ्याची वाहतूक होत आहे.
"यंदा दुष्काळाने शेतीची सर्व समीकरणे बिघडली आहेत. शासनाने या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत उपाययोजना कराव्यात. जनावरांना जगवण्यासाठी चाऱ्याची उपलब्धता होण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची गरज आहे."- दिगंबर पवार, वाखारी,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.