Cultural Policy : शाहीर, कवी वामनदादा कर्डक यांच्या केस माझे डोळीवरचे जेव्हा गळू लागले, तेव्हा माझे जीवन कळू लागले. या ओवींप्रमाणेच लोककलावंतांची कालची आणि आजची स्थिती आहे.
लोककलावंतांना प्रासंगिक महत्त्व दिले जाते. परंतु, त्यांच्या जीवनाची वाताहत झाली असून त्यांची अवहेलना थांबण्याची आस लोककलावंतांना आहे.
वयोवृद्ध कलावंतांना महागाई निर्देशांकानुसार मानधन दिले जावे, अशी आशा सांस्कृतिक धोरणातून लोककलावंतांना आहे. (folk artistes hope from cultural policy that seniors artistes should be paid according to inflation index nashik news)
भारतात संविधानिक मूल्यांच्या आधारे सामाजिक प्रबोधनाचे काम लोककलावंत करीत आहे. सामाजिक प्रबोधनाचे जलसे महात्मा फुले यांच्यापासून आजतागायत चालत आलेले असून लोककलावंत आर्थिक सक्षम होणे महत्त्वाचे आहे.
लोककला विद्यापीठाची स्थापना आवश्यक
तरुणपिढी लिहिते, गाते आहे मात्र त्यांना सुरवातीपासूनच अवहेलना सहन करावी लागत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना सांस्कृतिक धोरणात मूलभूत गोष्टींची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र्य विभाग असणे आवश्यक आहे.
विविध क्षेत्रांच्या विद्यापीठांची घोषणा होत आहे, मात्र जीवनात अविभाज्य भाग असलेल्या कला- क्रीडाक्षेत्रासाठी विद्यापीठ नसल्याची खंत कलावंतांना आहे. लोककला विद्यापीठ झाल्यास प्राथमिक स्तरापासून कलांचे ज्ञान देता येणे शक्य होणार आहे, त्यासाठी विद्यापीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. शैक्षणिक, विद्यापीठ स्तरावर लोककलांसाठी तरतूद होणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उदरनिर्वाहाचे साधन असावे
ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याचे काम लोककलावंत करतात. कलावंतांना विविध सण- उत्सवांव्यतिरिक्त कार्यक्रम मिळत नाही, त्यांना रोजंदारीवर काम करावे लागते. उदरनिर्वाहाचे साधन मिळत नाही.
वामनदादा कर्डकांनी शाहिरी प्रबोधनातून काम केले त्याची दखल अजूनही शासनाने घेतलेली नाही, महाराष्ट्रातील शाहिरांचे समग्र लोकसाहित्य प्रकाशित झाले पाहिजे. सामाजिक प्रबोधनाचे काम होत असताना शासनाच्या धोरणात कलावंतांना योग्य जागा मिळावी.
"महाराष्ट्रातील शाहीर अण्णा भाऊ साठे, वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित समग्र लोकसाहित्य प्रकाशित झाले पाहिजे. लोककलावंतांची अवहेलना थांबावी. सांस्कृतिक धोरणात लोककला विद्यापीठासाठी तरतूद असावी." - प्रा. शरद शेजवळ, अध्यक्ष, वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक
"लोककलावंतांना प्रबोधन करण्यासाठी शासनाने काम देऊन आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे. लोककलावंतांचे विविध योजनेतील अनुदान, मानधन वेळेवर मिळावे. लोककलावंतांना माजी सैनिकांप्रमाणे सुविधा मिळाव्यात. आर्टिस्ट कार्डद्वारे लोककलावंतांना घरे मिळावीत." -प्रा. प्रवीण जाधव, शाहीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.