नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राजकीय पक्षांच्या नेत्यांची नाशिकमध्ये उठबस सुरू झाली आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे राजकारणातील नवी पिढी नाशिकच्या मैदानात उतरताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकला हजेरी लावल्यानंतर आता मनसेचे युवानेते अमित ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. (Following Amit Thackeray Shrikant Shinde Nashik Daura today new generation in politics Nashik Political news)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर नाशिककरांनी या पक्षाला भरभरून साथ देत महापालिकेत सत्ता दिली. मात्र पक्षांतर गटबाजीमुळे अनेक नगरसेवकांनी निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची साथ केली. तेव्हापासून पक्षाला घरघर लागली आहे.
‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांना किमान नाशिकमध्ये तरी सत्ता मिळेल, अशी आशा होती. मात्र नाशिककरांनी ‘मनसे’च्या नगरसेवकांची संख्या पाच वर आणून ठेवली. नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी जवळपास नाशिककडे दुर्लक्ष केले, अधूनमधून नाशिकमध्ये दौरे केले, तरी ते दौरे पक्षबांधणीपेक्षा पर्यटनासाठीच अधिक होते.
परंतु असे असले तरी त्यांचे नाशिकवरचे प्रेम कमी झालेले नाही. अमित ठाकरे यांना राजकारणात उतरताना त्यांनी नाशिकची जबाबदारी दिली. अमित यांनी नाशिकमध्ये संघटना बांधणीसाठी ठोस पावले उचलले.
महापालिका निवडणुका होतील, अशी आशा असतानाच त्या लांबत गेल्या, तसे राजकीय वातावरणही थंड झाले. मात्र आता राज्यातील राजकारणाची दिशा बघता निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्या अनुषंगाने अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी (ता. २८) सकाळी ते नाशिकमध्ये येतील. दिवसभर पक्षाच्या रायगड कार्यालयात पदाधिकाऱ्यांना भेटतील. प्रभागांची निश्चिती नसली तरी जुन्या प्रभागनिहाय प्रत्येक प्रभागातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी पंधरा मिनिटे ते देतील. बुधवारी दुपारनंतर दौरा आटोपून मुंबईला परततील.
शिंदे यांच्या उपस्थितीत युती सेनेचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखाली आलेल्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात युती सेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन ते करतील.
त्यानंतर कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी भेट देतील. महाकवी कालिदास कलामंदिर येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या रोजगार मेळाव्यालाही ते भेट देतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.