सातपूर (जि. नाशिक) : आज दि. 29 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी पाठलाग करून व सापळा रचून गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर पकडून झाडाझडती केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.
पैकी एका वाहनातून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईल ने त्याचा 1 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. (Food and Drug Administration strike action in Igatpuri gurunanak dhaba area Nashik Crime News)
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्र.RJ 06 GB 5203 या कंटेनर मधून SHK Premium या गुटक्याचा एकूण 1,50,54,000/- किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वाहन क्र. RJ 09 GB 0472 या कंटेनर मधून SHK Premium, Safar व 4K (STAR) या ब्रँडचा एकूण 45,33000/- किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण 1,95,87000/- रु किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा व अंदाजे 30 लाख किमतीचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात पुढिल कारवाईसाठी दिले आहेत. तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 328, 272,273,188 व अन्न सुरक्षा मानदे कायद्यातर्गत FIR ची नोंद करण्याची प्रकीया सुरूआहे . पुढिल तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मा. मंत्री महोदय श्री. संजयजी राठोड, प्रशासनाचे आयुक्त मा. अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्री गणेश परळीकर, सहायक आयुक्त श्री उदय लोहकरे, श्री मनिष सानप यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री गोपाल कासार व श्री अमित रासकर यांनी केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.